बांगलादेशवर धमाकेदार विजय, WTC ची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला अजून किती सामने जिंकावे लागणार?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली गेली. यात मंगळवारी कानपुर येथे झालेला सामना टीम इंडियाने ७ विकेट्सने जिंकला. सीरिजमध्ये २-० ची आघाडी घेऊन टीम इंडियाने टेस्ट सीरिज सुद्धा नावावर केली. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंटेबलमध्ये टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे.
1/8
2/8
3/8
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही बॉल खेळवला न जाता सामना रद्द करण्यात आला. चौथ्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला 233 धावांवर रोखले. टीम इंडियाने फलंदाजी करताना बांगलादेशची आघाडी मोडीत काढून 285 धावा केल्या. बांगलादेशने चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारताची आघाडी मोडून विजयासाठी भारताला 95 धावांचे लक्ष दिले. हे लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पूर्ण केले.
4/8
भारताने बांगलादेशवर मिळवलेल्या या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये सुद्धा त्यांना मोठा फायदा झाला. या पॉईंट टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2023-2025) च्या सायकलमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 11 टेस्ट सामने खेळले असून यापैकी 8 सामने त्यांनी जिंकले आहेत. तर केवळ 2 टेस्ट सामन्यात त्यांचा पराभव आणि एक सामना टाय झालाय. भारताच्या विजयाची टक्केवारी 74.24 टक्के इतकी आहे.
5/8
6/8
7/8