सासूच्या मृत्यूनंतरही हसत होती अर्चना पूरनसिंग, पतीने कित्येक वर्षांना केला खुलासा; '15 मिनिटं...'

बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरन सिंग अनेक वर्षांपासून 'कपिल शर्मा शो'सह जोडलेली आहे. अर्चना आधी 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये होती. आता ती 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्येही दिसत आहे.   

| Oct 01, 2024, 19:01 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरन सिंग अनेक वर्षांपासून 'कपिल शर्मा शो'सह जोडलेली आहे. अर्चना आधी 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये होती. आता ती 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्येही दिसत आहे. 

 

1/10

बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरन सिंग अनेक वर्षांपासून 'कपिल शर्मा शो'सह जोडलेली आहे. अर्चना आधी 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये होती. आता ती 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्येही दिसत आहे.   

2/10

कपिल शर्माच्या शोमध्ये जोरजोरात हसण्यावरुन ती नेहमीच चर्चेत असते. एकीकडे यावरुन ट्रोल होत असताना अर्चनाचं हसणं कपिल शर्मा शोला वेगळी ओळख देतं.   

3/10

पण अनेकदा अर्चनाच्या हसण्यामागे मोठं दु:खही दडलेलं असतं. पण ती कोणाला याची जाणीव होऊ देत नाही.   

4/10

अर्चनाने नुकतंच इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत अर्चना पूरनसिंगने एक मोठा खुलासा केला आहे.   

5/10

अर्चनाने सांगितलं की, सेटवर शुटिंग सुरु असतानाच तिला सासूच्या निधनाची बातमी मिळाली होती. पण यानंतर तिने हसत हसत सर्व शूट पूर्ण केलं होतं.   

6/10

अर्चनाने सांगितलं की, मी तेव्हा फार हसली होती. माझ्या सासूचं निधन झालं असताना त्यावेळी माझ्या डोक्यात काय विचार सुरु असतील याचा विचार करा.  

7/10

"मला माहिती नाही की, त्यावेळी मी कसं काय हसत होती. तुम्ही जेव्हा 30-40 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करता तेव्हा तुम्हाला निर्मात्यांचा किती पैसा लागला आहे याची जाणीव असते. तुम्ही मधेच काम सोडू शकत नाही".  

8/10

अर्चना पूरनसिंगने यावेळी कशाप्रकारे मेकर्सने आपल्याला हसतानाचे शॉट्स देण्यास सांगितलं होतं, जेणेकरुन ते विनोदांच्या मधे वापरता येतील याबद्दलही सांगितलं.   

9/10

आपला पती परमीतने माझी स्थिती समजून घेतली, त्याला फक्त 15 मिनिटं  हवी होती असंही तिने सांगितलं.   

10/10

अभिनेत्रीने सांगितलं की, सासूच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर ती ब्लँक झाली होती. माझ्या डोक्यात फक्त सासूचा मृत्यू आणि शॉट्स देणं याबद्दलच विचार सुरु होते. दु:खाच्या या वेळी तिला जबरदस्ती हसावं लागत होतं.