पुणे मेट्रो सुस्साट... पहिली गाडी कधी सुटणार; तिकिट दर कसे असतील?, वाचा एका क्लिकवर

पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन  झाले आहे. कशी असेल ही मेट्रो आणि तिकिट दर 

Mansi kshirsagar | Mar 06, 2024, 11:03 AM IST

Pune Metro Latest News: पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन  झाले आहे. कशी असेल ही मेट्रो आणि तिकिट दर 

1/7

पुणे मेट्रो सुस्साट... पहिली गाडी कधी सुटणार; तिकिट दर कसे असतील?, वाचा एका क्लिकवर

 Pune Metro PM narendra modi flags off metro railway services from ruby hall to ramwadi

पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन  पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रोला  हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते झाले.   

2/7

स्थानके किती

Pune Metro PM narendra modi flags off metro railway services from ruby hall to ramwadi

 रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे.   

3/7

येरवडा स्थानक वगळले

Pune Metro PM narendra modi flags off metro railway services from ruby hall to ramwadi

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा स्थानक सध्या वगळण्यात आले आहे. येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो दुसरीकडे हलविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडे करण्याचे काम सुरू झाले आहे.

4/7

मेट्रोच्या वेळा अशा असतील

Pune Metro PM narendra modi flags off metro railway services from ruby hall to ramwadi

- सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत. - गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहेत. - 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत.

5/7

मेट्रोचे तिकिट दर

Pune Metro PM narendra modi flags off metro railway services from ruby hall to ramwadi

वनाझ ते रामवाडी  ३० पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट ₹30 वनाझ ते पिंपरी चिंचवड ₹35 रूबी हॉल ते पिंपरी चिंचवड ₹30 वनाझ ते डेक्कन जिमखाना ₹20 पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन ₹30

6/7

तिकिटदरांत सवलत

Pune Metro PM narendra modi flags off metro railway services from ruby hall to ramwadi

पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिटदरात सवलत देण्यात आली आहे. पदवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना ₹30% सवलत देण्यात आली आहे. तर, शनिवार रविवार सर्वांना ₹30% सवलत मिळणार आहे.   

7/7

मेट्रोची विस्तारीत सेवा

Pune Metro PM narendra modi flags off metro railway services from ruby hall to ramwadi

मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी १ ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला. आता वनाज ते रुबी हॉल मार्ग रामवाडीपर्यंत विस्तारण्यात आला.