Mahashivratri 2024: ऐतिहासिक वारसा सांगणारे पुण्यातील प्राचीन शिवमंदिरं

पुणे तिथे काय उणे अशी पुण्याबद्दल असलेली म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. शिक्षणाचं माहेरघर आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या पुण्याला धार्मिक वारसा ही तितकाच लाभला आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने हा वारसा सांगणाऱ्या पुण्यातील प्राचीन शिवमंदिरांचा इतिहास जाणून घेऊया. 

Mar 06, 2024, 10:37 AM IST
1/7

ओंकारेश्वर

पुण्यातील शनिवार पेठेत  पेशव्यांच्या काळातील हे प्राचीन शिवमंदिर आहे. मुळा मुठा नदीच्या जवळ असलेल्या या मंदिरात श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते.

2/7

चिमाजी आप्पांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलेल्या या नऊ कळस असलेल्या मंदिराची शिल्पकला विलोभनीय आहे.   

3/7

अमृतेश्वर मंदिर

बाजीराव पेशवेंची बहिण भिऊबाई बारामतीकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे दीर बाबूजी नाईक यांनी अमृतेश्वर मंदिराची स्थापना केली. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर पेशवे घराण्याच्या जोडले गेले आहे.

4/7

मंदिर परिसरात शिवशंकराच्या मंदिरासोबतच राम मंदिर, विठ्ठल मंदिर आणि विष्णू-लक्ष्मीचं मंदिर आहे. दगडी बांधकाम आणि त्यावर असलेली शिल्पकला, त्याचबरोबरच समोरच असलेलं  तुळशी वृंदावन हे  मंदिराची शोभा वाढवतं. 

5/7

पाताळेश्वर मंदिर

शिवाजीनगर परिसरात असलेली पाताळेश्वर लेणीमध्ये हे शिवमंदिर 8 व्या शकतकात असल्याचं सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की, पांडव वनवासात होते तेव्हा त्यांनी या मंदिराची स्थापना केली.   

6/7

भुलेश्वर मंदिर

पार्वतीच्या सौंदर्याला भुलणारा शिवशंकर म्हणजे भुलेश्वर. भुलेश्वर मंदिराची टेकडी ही पुर्वीचा दौलतमंगल किल्ला म्हणून ओळखला जातो. सत्तेत असताना औरंगजेबाने या मंदिराची विटंबना केल्याचे पुरावे आजही सापडतात.    

7/7

पार्वती टेकडी मंदिर

निसर्गाच्या सान्निध्यात वेढलेली ही टेकडी पर्यटकांना कायमच आकर्षित करते. या पार्वती टेकडीवर शिव पार्वतीचं मंदिर आहे. 17440 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराची उभारणी केली.