वर्षाला मिळतील 1 लाख11 हजार रुपये, पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून जाणून घ्या

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. 

| Apr 14, 2024, 10:26 AM IST

Post office MIS monthly income scheme:पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. 

1/7

वर्षाला मिळतील 1 लाख11 हजार रुपये, पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून जाणून घ्या

Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News

Post office Scheme: दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपल्या खात्यात येत राहावी, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुम्हाला माहिती असायला हवी. 

2/7

दर महिन्याला 9 हजार 250 रुपये

Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News

यामध्ये तुम्ही एकट्याचे किंवा दोघांचे एकत्र खाते सुरु करु शकता. याद्वारे तुम्ही वर्षाला 1 लाख 11 हजार म्हणजेच दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवू शकता. याबद्दल जाणून घेऊया.

3/7

रक्कम पूर्णपणे सुरक्षित

Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.  जमा केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते आणि तुम्हाला दर महिन्याला यावर व्याज मिळत राहते. 

4/7

POMIS वर किती व्याज मिळते?

Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News

पोस्ट ऑफिस MIS मध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. सध्या यावर 7.4% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेतून संयुक्त खात्याद्वारे 9,250 रुपयांपर्यंत रक्कम मिळते. खास करुन सेवानिवृत्त या योजनेचा फायदा घेतात. पती-पत्नीने एकत्रित ही गुंतवणूक केल्यास तुमच्या महिन्याचे उत्पन्न ठरु शकते. 

5/7

संयुक्त खाते उघडले तर?

Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News

तुम्ही संयुक्त खात्यात रु. 15 लाख जमा केल्यास या रक्कमेवर तुम्हाला 7.4 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच एका वर्षात 1 लाख 11 हजारचे हमी उत्पन्न मिळेल. 5 वर्षात तुम्हाला व्याजातून 1 लाख 11 हजार गुणिले 5 केल्यास 5 लाख 55 हजार मिळतील. 1 लाख 11 हजार रुपयांचे वार्षिक व्याज उत्पन्न 12 भागांमध्ये विभागले तर ते 9 हजार 250 रुपये येईल. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 9,250 रुपये उत्पन्न मिळेल.

6/7

एकच खाते उघडले तर?

Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News

जर तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकच खाते उघडले आणि त्यात 9 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला एका वर्षात 66,600 रुपये व्याज मिळू शकते. 5 वर्षांत व्याजाची रक्कम रुपये 66 हजार 600 x 5 = 3  लाख 33 हजार रुपये  इतकी होईल.  याचा अर्थ तुम्ही व्याजातून 66 हजार 600 x 12 =  5 हजार 550 रुपये दरमहा कमवू शकता.

7/7

कोणासाठी योजना?

Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News

कोणत्याही देशाचा कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत सहभागी पडू शकता. तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. मूल 10 वर्षांचे झाल्यावर त्याला स्वतः खाते चालवण्याचा अधिकार मिळतो.