बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध, त्यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे
Marathi Baby Names on Gautam Buddha : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना आदर्शस्थानी गुरु म्हणून मानलं. आज भिम जयंतीनिमित्त गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे.
Unique Baby Boys Names in Marathi: 14 एप्रिल 2024 रोजी डॉ. भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. समाजातील दुर्बल, मजूर आणि महिलांना सक्षम करण्यासाठी बाबासाहेबांनी दीर्घ लढा दिला आणि आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश समजल्या जाणाऱ्या वर्गाला समान हक्क मिळवून देण्यासाठी समर्पित केले. खालच्या जातीत जन्मलेल्या भीमराव आंबेडकरांना लहानपणापासूनच भेदभावाचा सामना करावा लागला, असे म्हणतात. त्यांना समाजातील जातिव्यवस्था संपवायची होती.
बाबासाहेबांनी गौतम बुद्ध यांना आदर्श गुरु मानलं. भगवान गौतम बुद्ध यांना अहिंसा आणि ज्ञानाचे प्रतिक मानले जाते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. अनेक वर्ष कठोर तपस्या केल्यानंतर ज्ञान प्राप्ती झाली आहे. भारतासोबतच चीन, थायलंड, बर्मा आणि श्रीलंका येथे बौद्ध धर्माचे अनुयायी आहे. आज आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गौतम बुद्धांच्या नावावरुन काही नावे पाहणार आहोत.