हे क्षण कॅमेरात कैद झाले हाच चमत्कार! Wildlife Photographer of the Year च्या शर्यतीमधील 7 फोटो पाहाच

Wildlife Photographer of the Year : मुख्य म्हणजे फक्त विजेता फोटोच नव्हे, तर त्याच्यासोबत शर्यतीत असणारे इतर फोटोही तितकेच खास. नॅच्युरल हिस्ट्री म्युजियमकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 'आईस बेड' नावाच्या छायाचित्रानं बाजी मारली. तब्बल 50 हजार छायाचित्रांमधून हे दृश्य बाजी मारून गेलं आहे.   

Feb 08, 2024, 14:37 PM IST

Wildlife Photographer of the Year : नुकताच वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये एका गोड फोटोनं बाजी मारली आहे. सध्या जागति स्तरावर या एका फोटोची प्रचंड चर्चा होताना दिसतेय. 

1/7

बर्फावर निवांत झोपी गेलेलं अस्वल

Peoples Choice Award Wildlife Photographer of the Year polar bears Photo

ब्रिटीश छायाचित्रकार Nima Sarikhani यांनी एका हिमनगावर निवांत झोपी गेलेल्या या हिम अस्वलाचा फोटो टीपला. या अद्वितीय छायाचित्रासाठी त्यांना पीपल्स चॉईस अवॉर्डकडून Wildlife Photographer of the Year या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या शर्यतीत त्यांच्याशी स्पर्धा असणारी छायाचित्रही तोडीस तोड होती. 

2/7

...आणि योग जुळून आला

Peoples Choice Award Wildlife Photographer of the Year polar bears Photo

Tzahi Finkelstein किनारपट्टीवरील पक्ष्यांची छाया टीपण्यासाठी गेले असता त्यांना एक कासव दिसला आणि त्याच्या नाकावर अचानकच एक किटक बसला, त्याच क्षणी टीपलेलं हे दृश्य. 

3/7

पक्ष्यांनी तयार केलेला पक्षी

Peoples Choice Award Wildlife Photographer of the Year polar bears Photo

Daniel Dencescu यांनी अनेक तास खर्ची घालत इटलीतील रोम येथे टीपलेला हा कमाल फोटो. इथं जणू कैक पक्ष्यांनीच एका पक्ष्याचा आकार तयार केला होता. 

4/7

जंगलाचे अंतरंग

Peoples Choice Award Wildlife Photographer of the Year polar bears Photo

मार्क बॉईड यांनी टीपलेला हा फोटो पाहताना एका लहान मुलाचीच आठवण होते. जंगलाच्या राजाचं कुटुंब तुम्हाला कसं वाटतंय? मसाई मारा येथे ही झलक टीपण्यात आली. 

5/7

जेलीफिश

Peoples Choice Award Wildlife Photographer of the Year polar bears Photo

नॉर्वेच्या जलस्त्रोतांमध्ये पोहणाऱ्या जेलीफिशमुळं पाण्यावर तयार झालेला अदभूत आकार टीपला आहे Audun Rikardsen नं.   

6/7

हा मासा ओळखला का?

Peoples Choice Award Wildlife Photographer of the Year polar bears Photo

करिम लिया यांनी टीपलेला समुद्राच्या अंतरांगांचा हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाण्यात दिसणारा हा मासा तुम्हाला ओळखता येतोय का? 

7/7

पेंग्निन

Peoples Choice Award Wildlife Photographer of the Year polar bears Photo

बर्फाच्छादीत प्रदेशातील हे पाहुणे काहीतरी बोलत असावेत... नाही का? हा फोटो टीपला आहे स्टीफन क्रिस्टमननं.