तुटलेली चप्पल, जुने कपडे; जेव्हा पहिल्यांदाच जगजीत सिंह यांना भेटले गुलझार!

जगजीत सिंग यांच्याविषयी काही खास ओळख सांगण्याची गरज नाही. त्यांच्याविषयी जितकं सांगावं तितकं कमी आहे. त्यांचं खासगी आयुष्य हे त्यांच्या कामाप्रमाणेच चर्चेत राहिलं आहे. आज 8 फेब्रुवारी जगजीत सिंग यांचा स्मृती दिन आहे. त्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यापैकी एक म्हणजे जगजीत सिंग आणि गुलजार यांची पहिली भेट. 

Diksha Patil | Feb 08, 2024, 14:29 PM IST
1/7

गुलजार यांच्यामुळे बदललं आयुष्य

गुलजार यांनी जगजीत सिंग यांच्या आयुष्यात अशी एन्ट्री केली की दोघांनी भारतीय संगीताचं दृष्य बदललं. 

2/7

कशी झाली भेट?

संगीतकार मदन मोहन यांच्याघरी संगीताची महफिल जमली होती आणि जगजीत यांच्यासाठी ही एकमेव अशी संधी होती. ते पावसात कसे बसे मदन मोहन यांच्या घरी पोहोचले. 

3/7

तुटलेली चप्पल अन् जुने कपडे

मदन मोहन यांच्या घरी पोहोचल्यानंतर जगजीत यांना त्यांच्या तुटलेली चप्पल घालून आत जाण्यास लाज वाटत होती. हे पाहता मदन मोहन यांचा मुलगा संजीव कोहली यांनी त्यांची एक मोजडी आणली आणि जगजीत यांना दिली. 

4/7

जगजीत यांनी गायली गजल

मदन मोहन यांच्या कार्यक्रमात जगजीत यांनी दोन गजल गायल्या. त्यानंतर जगजीत एका कोपऱ्यात शांत बसून राहिले. 

5/7

गुलजार यांनी सांगितला किस्सा

गुजलार म्हणाले होते की 'ते कायम माझ्या आठवणीत राहतील. फक्त एक गजल गायक म्हणून नाही तर एक चांगला मित्र म्हणून. तो हवेची झुळूकसारखा होता.' 

6/7

सुरुवातीला अशा घरात राहिले!

मुंबईत आल्यानंतर मुंबईच्या सेंट्रल रेल्वे परिसरात जगजीत हे ढेकूण आणि उंदीर असलेल्या खोलीत रहायचे. 

7/7

वयाच्या 70 व्या वर्षी निधन

जगजीत सिंग यांचे 10 ऑक्टोबर 2011 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. (All Photo Credit : Social Media)