'या' पाच लोकांनी चुकूनही खावू नये पेरू; तब्येत बिघडवून घ्याल

हिरवागार पेरू हे अनेक जणांचे आवडते फळ आहे. पेरू आरोग्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट्य असे फळ आहे. आयुर्वेदातही पेरू खाण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. मात्र, पेरू खाण्याचेही नियम आहेत पेरू कोणी खावा व कोणी खावू नये या बाबत जाणून घेऊया. 

| Nov 23, 2023, 17:37 PM IST

Guava Side Effects: हिरवागार पेरू हे अनेक जणांचे आवडते फळ आहे. पेरू आरोग्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट्य असे फळ आहे. आयुर्वेदातही पेरू खाण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. मात्र, पेरू खाण्याचेही नियम आहेत पेरू कोणी खावा व कोणी खावू नये या बाबत जाणून घेऊया. 

1/7

पौष्टिक

People who should be careful while eating Guava peru

पेरू खाणे पौष्टिक समजले जाते. ज्यांची पचनसंस्था कमजोर आहे त्यांनी आवर्जुन पेरू खावा, असं सांगण्यात येते. या फळात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, पॉटेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, झिंक,कॉपर कार्बोहायड्रेट, अँटीडायबिटीक, अँटी डायरिएल, अँटी मायक्रोबिएल गुण आढळतात. पेरूमध्ये इतके पौष्टिक तत्वे असूनही काही जणांसाठी पेरू खाणे घातक ठरु शकते. (Guava Side Effects In Marathi)

2/7

ऑपरेशन किंवा सर्जरी

People who should be careful while eating Guava peru

जर तुमचे एखादे ऑपरेशन किंवा सर्जरी होणार असेल तर साधारण दोन आठवडे आधी पेरू खाणे टाळावे. कारण हे फळ खाल्ल्यामुळं रक्तदाब बिघडू शकतो. तसंच, रक्तातील साखरेची पातळी कमी करु शकतो. त्यामुळं रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो

3/7

गर्भवती स्त्रिया

People who should be careful while eating Guava peru

गर्भवती स्त्रियांनी किंवा स्तनदा मातांनी पेरू खाणे टाळावे. कारण पेरूच्या सेवनाने शरीराचे तपमान वाढते आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. काही जाणकारांच्या मते मर्यादित प्रमाणात हे फळ खाणे योग्य असते. पण त्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

4/7

सर्दी-खोकला

People who should be careful while eating Guava peru

 पेरूचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळं ज्यांना सर्दी-खोकला सारखा आजार झाला असेल तर पेरू खावू नका. कारण तुम्हाला बरे होण्यासाठी खूप कालावधी लागेल.

5/7

पोटदुखीचा त्रास

People who should be careful while eating Guava peru

तुम्हाला सतत पोटदुखीचा त्रास असेल तर पेरूचे सेवन करणे टाळावे. कारण पेरूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळं डायरियाची समस्या वाढते.

6/7

अॅसिडीटी गॅस

People who should be careful while eating Guava peru

 तुम्हाला अॅसिडीटी गॅसचा त्रास असेल तर पेरू खावू नकाच. कारण यात व्हिटॅमीन सी, फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळं कधीकधी ब्लोटिंग किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. 

7/7

Disclaimer

People who should be careful while eating Guava peru

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)