Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?

अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 30, 2022, 08:15 AM IST

Niagara Falls Frozen : अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे या हिमवादळामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्याला मोठा फटका बसलेला असतानाच दुसरीकडे नैसर्गिक जलस्त्रोतांचंही रुप यामुळं पालटल्याचं पाहायला मिळत आहे. (Niagara Falls Frozen Bomb cyclone Snow storm continue in America see viral photos gives you goosebumps)

1/5

Niagara Falls Frozen Bomb cyclone Snow storm continue in America see viral photos gives you goosebumps

BOMB Cyclone मुळं जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असणारा नायगरा धबधबाही (Niagara Falls) गोठला आहे. नुकतीच या धबधब्याची दृश्य जगासमोर आली आणि तिथल्या तापमानाची सर्वांनाच कल्पना आली.  (छाया सौजन्य-ANADOLU AGENCY) 

2/5

Niagara Falls Frozen Bomb cyclone Snow storm continue in America see viral photos gives you goosebumps

धबधब्याचं खळाळून वाहणारं पाणी, पाण्याचे तुषार हे सर्व चित्र पालटलं असून आता तिथं सगळीकडे बर्फच बर्फ पाहायला मिळत आहे.  (छाया सौजन्य-LINDSAY DEDARIO/Reuters)

3/5

Niagara Falls Frozen Bomb cyclone Snow storm continue in America see viral photos gives you goosebumps

कधीही पाहिलं नाही असं दृश्य सध्या नायगरा धबधब्याच्या परिसरात पाहायला मिळत आहेत. संपूर्ण हिमच्छादित अशा या धबधब्याकडे पाहताना अनेकांनीच त्याची तुलना वंडरलँडशी करण्यास सुरुवात केली आहे.   (छाया सौजन्य-ANADOLU AGENCY) 

4/5

Niagara Falls Frozen Bomb cyclone Snow storm continue in America see viral photos gives you goosebumps

 एकिकडे निसर्गाचं रक्तही गोठवणारं रुप आणि दुसरीकडे त्यातही खुलून येणारं सौंदर्य असं दुहेरी चित्र सध्या इथं पाहायला मिळत आहे. ही झलक टीपण्यासाठी सध्या या परिसरात काही पर्यटकही भेट देताना दिसत आहेत.  (छाया सौजन्य-LINDSAY DEDARIO/Reuters)  

5/5

Niagara Falls Frozen Bomb cyclone Snow storm continue in America see viral photos gives you goosebumps

 (छाया सौजन्य-LINDSAY DEDARIO/Reuters)