Lionel Messi ने दररोज कमावले 27 लाख; 'या' खेळाडूंनी कमावला बक्कळ पैसा

Lionel Messi : फोर्ब्सने यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश नाहीये. मात्र यामध्ये पुन्हा एकदा फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या खेळाडूंचा दबदबा दिसून आला आहे. 

Dec 29, 2022, 23:09 PM IST
1/5

या यादीमध्ये लिओनेल मेस्सी पहिल्या स्थानावर आहे. 10.5 अरब रूपये त्याची एकूण कमाई आहे. मुख्य म्हणजे यंदाचं वर्ष त्याच्यासाठी खूप खास होतं. त्याने यंदा अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून दिला.

2/5

अमेरिकेचा लेबरॉन जेम्स यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. बास्केटबॉल लीग एनबीएचा तो खूप मोठा स्टार आहे. त्याची एकूण कमाई 10 अरब रूपये इतकी आहे.

3/5

फुटबॉलचा दुसरा स्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची एकूण कमाई 9.5 अरब इतकी आहे. 

4/5

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार देखील या लिस्टमध्ये जास्त मागे नाहीये. त्याची एकूण कमाई 7.86 अरब असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. 

5/5

स्टीफन करी हा देखील एनबीए स्टार असून तो पाचव्या क्रमांकावर आहे. त्याची एकूण कमाई 7.68 अरब इतकी आहे.