परिक्षेच्या आधल्या रात्री चुकूनही करू नका 'या' गोष्टी नाही, तर करावा लागेल पश्चाताप!

परिक्षेत यशस्वी होण्यासाठी किंवा चांगले मार्क मिळावे यासाठी कितीही अभ्यास केला तरी तो कमीच असतो. त्यासाठी अनेक मुलं हे परिक्षेच्या आधल्या रात्री अभ्यास करतात. तुम्हीही असं करत असाल तर तुम्ही परिक्षेत गडबड करू शकतात. चला तर जाणून घेऊया परिक्षेच्या आधल्या रात्री कोणत्या गोष्टी करू नये. 

| Sep 27, 2024, 19:02 PM IST
1/7

परिक्षेच्या आधल्या रात्री खूप वेळ जागरण करता आणि परिक्षेची तयारी करता. त्यामुळे परिक्षेतील तुमचं लक्ष केंद्रित होऊ शकत नाही. त्यामुळे रात्री कमीत कमी 7-8 तासाची झोप असणं गरजेचं आहे. जेणेकरून सकाळी तुम्ही फ्रेश असाल आणि पेपर लिहिताना अलर्ट असाल. 

2/7

काही विद्यार्थी ठीक आधी नोट्स आणि स्टडी मटेरियल शोधतात. त्यामुळे मुलांनी आधीच त्यांच्या सगळ्या नोट्स या अपटूडेट ठेवायला हव्या. जेणेकरून कोणतीही कमी राहणार नाही.   

3/7

परिक्षेच्या अगदी काही तास आधी जर तुम्ही एका नवीन धड्याचा अभ्यास करता. तर तुम्हाला ते कळणार नाही असं होऊ शकतं. 

4/7

5/7

कोणत्याही परिक्षेत पास होण्यासाठी प्रयत्न करणं खूप स्ट्रेसफूल असू शकतं. त्यामुळे स्वत: ला वाचणात आणि गाणी किंवा म्युजिक ऐकण्यात गुंतवूण ठेवा. 

6/7

परिक्षेआधी जंक फूड खाऊ नका. त्यामुळे तुमचं पोट खराब होण्याची शक्यता असते. 

7/7

झोप घालवण्यासाठी जर तुम्ही जास्त कॉफी प्यायलात तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी परिक्षेला बसताना होऊ शकतो. त्यामुळे परिक्षे आधी सोडा, एनर्जी ड्रिंक किंवा कॉपी सारख्या गोष्टींचं सेवन करू नका.