Navratri 2024 : नवरात्रीचे उपवास करताना टाळा 'या' चुका, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. या नवरात्रोत्सवात अनेक घरांमध्ये घट बसतात, देवींचे आगमन होते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक भक्तगण उपवास करतात. उपवास करणं हे फायदेशीर मानलं जातं यामुळे बॉडी डिटॉक्स होते. परंतु जेव्हा खूप दिवसांसाठी उपवास पकडला जातो तेव्हा आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते. उपवास करताना काही चूक झाल्यास याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा उपवास करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे जाणून घेऊयात. 

| Sep 27, 2024, 18:27 PM IST
1/7

तळलेले किंवा रोस्ट केलेले पदार्थ खाणे टाळा :

नवरात्रीचा उपवास धरणारे लोक अनेकदा चिप्स, नमकीन फरसाण अशा गोष्टींचे सेवन करतात. परंतु अशा पदार्थांचे सेवन करण्यापासून वाचले पाहिजे. कारण हायजिन सोबतच या पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक आरोग्यासाठी नुकसानदायक असू शकतात. तसेच काहीजण घरी सुद्धा उपवासाचे पदार्थ बनवतात ज्यामध्ये खूप जास्त तेलाचा वापर केला जातो. उपवासादरम्यान जास्त तेलकट खाण टाळायला हवं कारण यामुळे पचनक्रिया बिघडते आणि डिहाइड्रेशनची समस्या सुद्धा होऊ शकते. 

2/7

कॅफिन युक्त पदार्थांपासून दूर राहा :

नवरात्रीचा उपवास करताना चहा किंवा कॉफी अशा पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा. रिकाम्या पोटी कॅफीनयुक्त पेयांचे सेवन केल्यास ऍसिडिटीची समस्या होऊ शकते. खास करून रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफीचे सेवन अजिबातच करू नका. तसेच जास्त साखरयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. 

3/7

जास्त धावपळ करणं टाळा :

उपवास करताना एनर्जी कमी होती तसेच मांसपेशी सुद्धा कमजोर होऊ लागतात.  म्हणून या दरम्यान हेवी वर्क आउट करणं टाळा. तसेच या उपवास असताना जास्त उन्हात जाणे सुद्धा टाळायला हवे. यामुळे डिहाइड्रेशन होऊन तुम्ही अजून कमजोर होऊ शकता आणि थकवा वाटू शकतो. 

4/7

हायड्रेशनवर खास लक्ष द्या :

उपवास करताना कमी पाणी पिण्याची चूक करू नका. कमी पाणी प्यायल्याने थकवा, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. भरपूर प्रमाणात पाणी पिण्यासोबतच नारळपाणी, द्राक्षम, संत्र, काकडी सारखी ताजी रसाळ फळ इत्यादींचे सेवन करावे. 

5/7

'या' चुका महागात पडतील :

काहीजण आधीपासूनच आजारी, कमजोर असताना सुद्धा उपवास ठेवतात. परंतु ही चूक खूप घातक ठरू शकते. जर तुमची ट्रीटमेंट सुरु असेल किंवा आरोग्याशी निगडित काही समस्या असतील तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.  

6/7

'या' गोष्टींनी मिळेल एनर्जी :

उपवास करताना दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी रात्री बदाम, अखरोड आणि पीनट्स (शेंगदाणे) पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. काही तासांच्या अंतराने फळांचे सेवन करू शकता.

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)