चिकन की मटण? थंडीच्या दिवसात काय खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं?

Mutton or Chicken : चिकन, मटणाचं नाव घेतलं की मांसाहारप्रेमी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकजण खाण्यापिण्याचे विविध पदार्थ ट्राय करतात. मांसाहारी लोक हिवाळ्यात पाया किंवा चिकन सूप पिण्यास प्राधान्य देता. पण तुम्हाला माहितीये का की हिवाळ्यात चिकन आणि मटण यापैकी काय खाणं जास्त फायदेशीर ठरतं? तर आज जाणून घेऊयात.   

| Dec 05, 2024, 13:43 PM IST
1/7

चिकन खाण्याचे फायदे :

चिकनच्या ब्रेस्टमध्ये प्रोटीनच प्रमाण खूप चांगलं असतं. सोबतच यात फॅट्सचे प्रमाण सुद्धा कमी असते. चिकनमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व आढळतात ज्यात व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि सेलेनियम इत्यादींचा समावेश असतो. सर्दी, खोकला इत्यादी झाल्यावर चिकन सूप पिणं खूप फायदेशीर ठरतं. 

2/7

मटण खाण्याचे फायदे :

मटणामध्ये फॅट्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात आढळतात. सोबतच यात आयरन, झिंक आणि व्हिटॅमिन बी 12 सुद्धा असते. त्यामुळेच मटण खाल्ल्यामुळे शरीरात एनर्जी येते. हिवाळ्यात मटण खाणे फायदशीर मानले जाते. खासकरून हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी मटण एक चांगला स्रोत आहे. मटण शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरतं ज्यामुळे हिवाळ्यात लोक मटण खाण्यास प्राधान्य देतात. 

3/7

चिकनमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते ज्यामुळे चिकन हे पचण्यास सोपं जातं, त्यामुळे ज्यांना पोटाशी निगडित समस्या असतील असे लोक देखील चिकन आरामात खाऊ शकतात. 

4/7

मटणामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे त्याला पचायला देखील वेळ लागतो. पण यामुळे शरीराला एनर्जी मिळते. ज्याची पचनशक्ती चांगली असेल ते लोक मटणाचे सेवन करू शकतात. पोटाशी निगडित समस्या असतील अश्या लोकांनी मटणाचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.   

5/7

चिकनमध्ये चरबी कमी असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे ज्यांचा एपिटाइड छोटा आहे अशा लोकांसाठी चिकन खाणं चांगला पर्याय आहे. 

6/7

मटण खाणं अशा लोकांसाठी चांगलं आहे ज्यांना संपूर्ण दिवस ऊर्जा हवी असते. सोबतच जे एनीमियामुळे पीडित आहेत अशा लोकांसाठी मटणाचे सेवन चांगले ठरते, कारण त्यात आयरनचं प्रमाण चांगलं असतं. पण मटण किंवा चिकनचे पदार्थ बनवताना त्यात तेल आणि मसाल्यांचा खूप जास्त वापर केला जातो त्यामुळे तुम्ही याचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे.   

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)