500 कोटीत विकला गेला ईशा अंबानीचा आलिशान बंगला; 12 बेडरुम, 24 बाथरुम असलेल्या घराचा नवा मालक कोण? Inside Photo

Isha Ambani House: एशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने आपला बंगला विकला आहे. अमेरिकेतील लॉस एंजिल्स वालवेमध्ये आलिशान बंगला 508 कोटी रुपयांना विकला आहे. 

| Dec 05, 2024, 12:22 PM IST

Isha Ambani House : एशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आपला बंगला विकला आहे. अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील आलिशान बंगला 508 कोटी रुपयांना विकला आहे. 

1/8

ईशा अंबानीचा बंगला

Isha Ambani House : एशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आपला बंगला विकला आहे. अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील आलिशान बंगला 508 कोटी रुपयांना विकला आहे. 

2/8

ईशा अंबानीचे हे घर बेव्हरली हिल्स, लॉस एंजेलिसच्या मध्यभागी आहे. 38,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला हा आलिशान बंगला अतिशय आलिशान आहे.

3/8

ईशाच्या बंगल्यात 12 बेडरूम आणि 24 बाथरूम आहेत. एक इनडोअर पिकलबॉल कोर्ट, जिम, सलून आणि स्पा, 155 फूट लांबीचा इन्फिनिटी पूल, एक आउटडोअर किचन आणि अनेक लॉन देखील आहेत. घराबाहेर मोठी बाग आहे. घरात इनडोअर आणि आउटडोअर स्विमिंग पूल आहेत.

4/8

ईशा अंबानीचे हे नवीन घर हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेझ आणि तिचा पती बेन ऍफ्लेक यांनी विकत घेतले आहे. हे आलिशान घर घेण्यासाठी जेनिफरने 508 कोटी रुपये दिले. या बंगल्याचा करार गेल्या वर्षी झाला होता.

5/8

जेनिफर लोपेझने 2022 मध्ये बेन ऍफ्लेकसोबत चौथे लग्न केले. जेनिफरकडे जवळपास 3332 कोटी रुपयांची संपत्ती आहे. नृत्यांगना म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जेनिफरचे भारतासह जगभरात चाहते आहेत.

6/8

2018 मध्ये ईशा अंबानीने आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. ईशाच्या सासरच्यांनी तिला लग्नात बंगला भेट म्हणून दिला होता. मुंबईत सी-फेसिंग बंगला दिला. थ्रीडी डायमंड थीम डिझाइनवर बनवलेल्या या घराची किंमत करोडोंमध्ये आहे.

7/8

ईशा अंबानीच्या घराचे नाव गुलिता आहे, जे दिसायला हिऱ्याच्या आकाराची आहे. 50 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या बंगल्याची किंमत 500 कोटी रुपये आहे. या घरामध्ये तीन तळघर आहेत, याशिवाय एक जेवणाची खोली आहे आणि सर्व सुविधा जसे की, एक मैदानी स्विमिंग पूल, थिएटर, हॉल यासारख्या सुखसोई होत्या. 

8/8

ईशा अंबानी ही मुकेश अंबानींची लाडकी आहे. रिलायंट रिटेलची संपूर्ण जबाबदारी ईशा अंबानीकडे आहे. ईशाच्या नेतृत्वाखाली रिलायन्सचे रिटेल क्षेत्र सतत वाढत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडशी व्यवहार केल्यानंतर ईशाने त्यांना भारतात आणले आहे.