Antilia च्या किचनमध्ये बनवला जातो मुकेश अंबानी यांचा आवडता पदार्थ, असतो खूप हेल्दी

भारतातील सगळ्यात मोठ्या व्यावसायिकांपैकी एक म्हणजे मुकेश अंबानी. मुकेश अंबानी यांचं कुटुंब कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतं. तुम्हाला माहित आहे का की मुकेश अंबानी इतके मोठे व्यावसायिक असले तरी देखील त्यांना गुजरातीच जेवण आवडतं. अशात मुकेश अंबानी यांचं आवडतं स्नॅक कोणतं आहे याविषयी जाणून घेऊया... 

| Aug 03, 2024, 17:47 PM IST
1/7

अ‍ॅन्टिलियाच्या किचनमध्ये हा स्नॅक स्पेशल बनवण्यात येतो. दिसण्यात हे स्नॅक ट्रेंडी आणि टेस्टमध्ये यमी दिसतयं. पण तुम्हाला माहितीये मुकेश अंबानी यांना आवडणारं हे स्नॅक खाण्यापासून नीता अंबानी देखील स्वत: ला थांबवू शकत नाहीत. चला तर जाणून घेऊया त्या स्नॅक विषयी...

2/7

मुकेश अंबानी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांचा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नामुळे चर्चेत होता. कितीही काही झालं तरी मुकेश अंबानी हे त्यांच्या आरोग्याकडे खास लक्ष देतात. मुकेश अंबानी रोज काहीही झालं तरी व्हेजिटेरियन असं डायट फॉलो करतात आणि जंक फूड मुळीच खात नाहीत. संपूर्ण दिवस एनर्जेटिक आणि फोकस्ड राहण्यासाठी त्यांना असं डायट घेणं हे गरजेचं असतं. 

3/7

त्यांना आवडणाऱ्या गोष्टी या अ‍ॅन्टिलियाच्या किचनमध्ये बनवण्यात येतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुपारचं जेवणं असो किंवा मग रात्रीचं जेवणं मुकेश अंबानी हे पारंपारिक भारतीय जेवण करतात. मुकेश अंबानी यांना गुजराती थाली खूप आवडते. 

4/7

मुकेश अंबानी यांना गुजराती थाली खूप आवडते. ज्यात डाळ, भाजी, भात, सूप आणि सॅलेट सहभागी असतं. असं जेवणं तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 

5/7

नेहमीच घरी बनवलेलं हेल्दी जेवण करणारे मुकेश अंबानी हे आठवड्यातून एकदा किंवा कधीतरी बाहेरचं जेवण करतात. पण त्या जेवणाचा आधी तपास करण्यात येतो. 

6/7

नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत पती मुकेश काय खातात आणि काय नाही याकडे संपूर्ण लक्ष देतात. नीता अंबानी यांच्या सांगण्याप्रमाणे मुकेश अंबानी यांना गुजराती डिश 'पनकी' आवडते. हे स्नॅक तांदळाचया पिठापासून बनवतात. त्यासाठी मेथीची पान आणि थोडी हळद ही तांदळाच्या पिठात घालतात. तर हे केळीच्या पानात बनवतात. 

7/7

मेथी आणि बाकी मसाल्यांमुळे त्याच व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. त्याचं कारण म्हणजे ते कमी तेलात आणि तुपात बनवतात. त्यामुळे हे लो फॅट स्नॅक असतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)