'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर राज्य तर Mufasa : The Lion King नं केली 'इतक्या' कोटींची कमाई

संपूर्ण भारतात 'पुष्पा 2' चां डंका असताना बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. त्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.   

Diksha Patil | Dec 22, 2024, 08:48 AM IST
1/7

सध्या संपूर्ण भारतात 'पुष्पा 2' या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. या सगळ्यात आता दुसरीकडे डिज्नीचा 'मुफासा: द लॉयन किंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. 

2/7

अशात आता 'पुष्पा 2' च्या क्रेझमध्ये या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर त्याची छाप सोडली आहे. तर 'मुफासा: द लॉयन किंग' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 

3/7

'मुफासा: द लॉयन किंग' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटासाठीची उत्सुकता ही फक्त मुलं नाही तर त्यासोबत मोठ्यांना देखील होती. 

4/7

या चित्रपटानं पहिल्या दिवशी 8.8 कोटींचं कलेक्शन केलं आहे. तर वीकेंडला त्याचा फायदा झाला आहे. Sacnilk च्या अर्ली रिपोर्ट्सनुसार, 'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटानं शनिवारी 14 कोटींची कमाई केली आहे. 

5/7

अशात चित्रपटाच्या एकूण कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर दोन दिवसात 22.80 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 

6/7

'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला शाहरुख खाननं त्याचा आवाज दिला आहे. तेलगू व्हर्जनला महेश बाबूनं आवाज दिला आहे. 

7/7

इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार, ओपनिंग वीकेंडला हा चित्रपट 30 कोटींची कमाई करु शकतो. तर दुसरीकडे 'पुष्पा 2' नं 17 दिवसात 1029.9 कोटींचं कलेक्शन केलं आहे.