Cricket : कोणी सैन्य दलात तर कोणी बँकत मॅनेजर, 'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत सरकारी नोकऱ्या
क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेक क्रिकेटर्स हे कोट्यवधीश असून ते मॅच फी सह, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, जाहिराती, ब्रँड इन्डॉर्समेंट्स, स्वतःचे व्यवसाय इत्यादी त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देते. तेव्हा आज अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत.
1/8
केएल राहुल :
भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज असणारा केएल राहुल याने भारताकडून टी 20 मध्ये 72, वनडेमध्ये 77, तर टेस्ट क्रिकेटमध्ये 50 सामने खेळले आहेत. केएल राहुलच्या खांद्यावर भविष्यात टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सुद्धा सोपवली जाऊ शकते. 2018 मध्ये केएल राहुल याला आरबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरी देण्यात आली होती. राहुल आरबीआयचा कर्मचारी असल्याने तो आरबीआयच्या अनेक जाहिरातींमध्ये दिसून येतो. केएल राहुलने कॉमर्समधून त्याचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
2/8
एम एस धोनी :
भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने तब्बल तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दिसतो. 2011 रोजी एम एस धोनीला भारतीय प्रादेशिक सैन्याने लेफ्टनंट कर्नल पद देऊन सन्मानित केले होते. 2019 च्या आयसीसी वर्ल्ड कपनंतर धोनीने दोन महिने भारतीय सैन्यदलात सेवा दिली होती.
3/8
सचिन तेंडुलकर :
भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 2013 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची संपत्ती एक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. सचिनला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' ने सन्मानित करण्यात आले होते. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला 2010 मध्ये भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टनची रँक देण्यात आली होती.
4/8
हरभजन सिंह :
भारताचा माजी क्रिकेटर गोलंदाज हरभजन सिंहने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी मोठे योगदान दिले. हरभजनने टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना 5045 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजन सिंहने 2016 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. हरभजन सिंहचे खेळातील शानदार प्रदर्शन पाहून पंजाब सरकारने त्याला पंजाब पोलीसमध्ये डीएसपीची पोस्ट दिली.
5/8
कपिल देव :
6/8
जोगिंदर शर्मा :
7/8