सलमान खानच्या बॉडीगार्डने खरेदी केली 'इतक्या' कोटींची लक्झरी कार

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने खरेदी केली महागडी कार. सोशल मीडियावर शेअर केला कारसोबतचा फोटो. कारची किंमत पाहून बसेल धक्का.

Soneshwar Patil | Aug 29, 2024, 14:58 PM IST
1/7

शेराची रेंज रोवर

अभिनेता सलमान खान हा देशातील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक आहे. त्याचा बॉलीगार्ड शेराही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. 

2/7

कुटुंबात नवीन सदस्य

शेरा नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत जोडलेला असतो. नुकतेच त्यांनी त्याच्या कुटुंबात एक नवीन सदस्य जोडला गेला असल्याचं म्हटलं आहे.  

3/7

1.4 कोटी किंमत

शेराने 1.4 कोटी रुपयांची लक्झरी कार रेंज रोव्हर स्पोर्ट खरेदी केली आहे. या महागड्या कारसोबतचा त्याचा फोटो त्याने शेअर केला आहे. 

4/7

कॅप्शन चर्चेत

शेराने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, देवाच्या कृपेने आम्ही आमच्या कुटुंबात एका नवीन सदस्याचे स्वागत केले. 

5/7

फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

राखी सांवत, मुदस्सर खान आणि अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही शेराच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

6/7

सेलिब्रिटी मित्र

इंडस्ट्रीमध्ये शेराचे अनेक सेलिब्रिटी मित्र आहेत. त्याच्यासोबत अनेकजण सेल्फी काढताना दिसत असतात. 

7/7

गुरमीत सिंह जॉली

शेराचे खरे नाव गुरमीत सिंह जॉली आहे. 18 वर्षांपासून तो सलमानला संरक्षण देत आहे. तो त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे.