PHOTO : वयाच्या 23 व्या वर्षी झाली 2 मुलांची आई; दुप्पट वयाच्या 3 अभिनेत्यांशी रोमान्स; Pushpa 2 मुळे प्रसिद्धी

Entertainment : आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, जी वयाच्या 23 व्या वर्षी 2 मुलांची आई झाली आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये तिने दमदार चित्रपटात काम केलं, चाहत्यांची मनंही जिंकली आहे. या अभिनेत्रीचा Pushpa 2 शी संबंध आहे. 

| Dec 05, 2024, 16:16 PM IST
1/7

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने 3 मेगाबजेट पॅन इंडिया चित्रपटांमध्ये काम केलंय. ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालू शकले नाहीत. पण तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. या अभिनेत्रीने वयाच्या 23 वर्षीय दोन अपंग मुलांना दत्तक घेतलं. 

2/7

आम्ही बोलत आहोत श्रीलीला. जी गेल्या काही दिवसांपासून  'पुष्पा 2: द रुल' मधील 'किसिक' गाण्यासाठी चर्चेत आहे. या पॅन इंडिया चित्रपटात ती अल्लू अर्जुनसोबत आयटम नंबर करत आहे. या अभिनेत्रीबद्दल फार कमी लोकांना माहितीय असून ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. 

3/7

श्रीलीलाचा 200 कोटींच्या बजेटचा चित्रपट यावर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसला होता. 'गुंटूर करम' असं या चित्रपट असून तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. हा चित्रपट फक्त 150 कोटी रुपये जमा करु शकला.  

4/7

श्रीलीलाने यापूर्वी तमिळ सुपरस्टार नंदामुरी बालकृष्णासोबत 2023 मध्ये 'भगवंत केसरी'मध्ये अभिनय केला आहे. ज्यांना NBK म्हणूनही ओळखलं जातं. 130 कोटी रुपयांत बनलेला हा पॅन इंडिया चित्रपटही 100 कोटी रुपयांपर्यंत मजल मारू शकला. 

5/7

श्रीलीलाने रवी तेजासोबतही काम केलंय पण तोही चित्रपट फ्लॉप झाला.टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, श्रीलीलाने 2022 मध्ये एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तेथील दोन मुलांची अवस्था पाहून ती भावूक झाली आणि 18 फेब्रुवारी 2022 रोजी तिने दोन अपंग मुलांना आयुष्यभरासाठी दत्तक घेतलं. 

6/7

सिनेमा एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, जेव्हा श्रीलीलाला फर्स्ट ईयरला होती तेव्हा तिने 'किस' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होतं. श्रीलीलाचा जन्म 14 जून 2001 रोजी अमेरिकेतील मिशिगन इथे झाला. त्यांची आई स्वर्णलता बंगळुरूमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.

7/7

तिचे वडील बिझनेसमन सुरपानेनी शुभकर राव आणि आईचा घटस्फोट झाल्यानंतर श्रीलीलाचा जन्म झाला. श्रीलीला बालपणी भरतनाट्यम शिकलीय. या अभिनेत्रीला चित्रपटात यायचं नव्हतं. तर तिला डॉक्टर व्हायचं होतं. 2021 मध्ये ती एमबीबीएसच्या अंतिम वर्षात होती. पण तिने ते पूर्ण केलं की नाही याबद्दल काही माहिती नाही.