दिवाळीत घरी आणा नवी कोरी Baleno, Maruti ने नव्या अवतारात केली लाँच; फिचर्सही नवे अन् किंमतीतही बदल

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सणासुदीच्या निमित्ताने आपली प्रसिद्ध लोकप्रिय प्रिमियम हॅचबॅक कार Maruti Baleno ला नव्या अवतारात लाँच केलं आहे.   

Shivraj Yadav | Oct 15, 2024, 14:43 PM IST

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सणासुदीच्या निमित्ताने आपली प्रसिद्ध लोकप्रिय प्रिमियम हॅचबॅक कार Maruti Baleno ला नव्या अवतारात लाँच केलं आहे. 

1/11

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सणासुदीच्या निमित्ताने आपली प्रसिद्ध लोकप्रिय प्रिमियम हॅचबॅक कार Maruti Baleno ला नव्या अवतारात लाँच केलं आहे.   

2/11

कंपनीने मारुती बलेनोचं नवं रीगल एडिशन (Regal Edition) लाँच केलं आहे. या नव्या एडिशनमध्ये कंपनीने काही नवे फिचर्स दिले आहेत.   

3/11

हे एक लिमिटेड टाइम स्पेशल व्हेरियंट आहे, जे सर्व ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऑटोमॅटिक आणि सीएनजी व्हेरियंटचा समावेश आहे.   

4/11

कंपनीचं म्हणणं आहे की, बलेनो रीगल एडिशनला कारचं अपील वाढवण्याच्या हेतूने तयार करण्यात आलं आहे. याच्या केबिनमध्ये आराम देणारे आणि स्टायलिश डिझाईन एलिमेंट्स देण्यात आले आहेत.   

5/11

कमी पैशात अॅडव्हान्स फिचर्सची अपेक्षा असणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार एक चांगला पर्याय आहे.   

6/11

याच्या एक्स्टीरियर अपग्रेडमध्ये नवे अपर ग्रिल गार्निश, फॉग लॅम्प गार्निश, बॉडी साइड मेल्डिंग, पुढे आणि मागे अंडरबॉडी स्पॉयलर आणि एलईडी प्रोजेक्टर हेडलँप दिला आहे.   

7/11

केबिनमध्ये स्टायलिश इंटिरिअर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये नवे सीट कव्हर्स, ऑल वेदर 3डी मॅ़ट्स, विंडो कर्टन, कलर हेड अप डिस्ल्पे, 9 इंचाची इंफोटेंमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमऱ्याचा सहभाग आहे.   

8/11

सुरक्षेसाठी नेक्सा सेफ्टी शील्ड, 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशनसह एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम दिलं आहे.   

9/11

मारुती बलेनो चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये सिग्मा, डेल्टा, जेटा आणि अल्फा यांचा सहभाग आहे. याची किंमत 6.66 लाखांपासून सुरु होऊन 9.83 लाखांपर्यंत आहे.   

10/11

अल्फा व्हेरियंटमध्ये 45,829 रुपयांमध्ये कॉम्प्लिमेंटरी एक्सेसरीज आहेत. तर जेटा ट्रीममध्ये 50 हजार 428 रुपयांत एक्सेसरीज मिळतात.   

11/11

डेल्टा रिगल एडिशनमध्ये 49 हजार 990 रुपयात मोफत एक्सेसरीज मिळतात. तर सिग्मा व्हेरियंटमध्ये 60 हजार 199 रुपयांत कॉम्प्लिमेंटरी एक्सेसरीज मिळत आहेत.