कितीही स्वच्छ केले तरी पिवळट डाग जात नाहीत, 'या' टिप्स वापरा नव्यासारखं चमकेल तुमचं बेसिन

बाथरुममधील बेसिनवर पिवळट रंगाचे डाग पडले आहेत. कितीही घासलं किंवा साबण लावला तरी हे डाग जात नाहीत. अशावेळी ही एक टिप वापरून पाहा

Mansi kshirsagar | Oct 15, 2024, 14:40 PM IST

बाथरुममधील बेसिनवर पिवळट रंगाचे डाग पडले आहेत. कितीही घासलं किंवा साबण लावला तरी हे डाग जात नाहीत. अशावेळी ही एक टिप वापरून पाहा

1/7

तासनतास घासूनही पिवळे डाग जात नाहीत, 'या' टिप्स वापरा, नव्यासारखं चमकेल तुमचं बेसिन

kitchen hacks in marathi How to remove tough stains from ceramic sink

बाथरुमधील बेसिनचा सतत वापर होत असतो. घरातील वॉश बेसिन काळपट किंवा पिवळ्या रंगाचे दिसत असेल तर पाहुण्यांसमोर आपल्यालाच खजिल व्हायला होतं. 

2/7

kitchen hacks in marathi How to remove tough stains from ceramic sink

 बेसिन सिंकवर जमलेले जिद्दी डाग हटवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळं तुमच्या बाथरुममधील बेसिन पांढरशुभ्र होऊन चमकायला लागेल. 

3/7

kitchen hacks in marathi How to remove tough stains from ceramic sink

लिंबू आणि बेकिंग सोडा हे एक नैसर्गिक क्लिंजर आहे. हे बनवण्यासाठी एक लिंबाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करा. आता ही पेस्ट बेसिनला लावून घ्या. 10 ते 15 मिनिटांना एका ब्रशच्या सहाय्याने बेसिन घासून घ्या. नंतर पाण्याने धुवून काढा. डाग निघून जातील. 

4/7

kitchen hacks in marathi How to remove tough stains from ceramic sink

व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचे मिश्रणदेखील खूप प्रभावी आहे. सुरुवातीला बेसिन ओलं करा. नंतर एक कप बेकिंग सोडा टाकून त्यावर एक कप व्हिनेगर टाकून घ्या. 

5/7

kitchen hacks in marathi How to remove tough stains from ceramic sink

 काही मिनिटांसाठी ते तसंच ठेवून द्या नंतर त्यावर फेस यायला लागल्याने स्पंजने साफ करा आणि मग पाण्याने धुवून टाका. 

6/7

kitchen hacks in marathi How to remove tough stains from ceramic sink

 हायड्रोजन पेरॉक्साइटदेखील चांगला पर्याय आहे. जे डाग हटवण्यासाठी मदत करते. हे थेट डागांवर लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसंच ठेवून द्या. त्यानंतर एका ब्रश किंवा स्पंजने साफ करा नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करुन घ्या. 

7/7

kitchen hacks in marathi How to remove tough stains from ceramic sink

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)