ना कोणी हिरोईन, ना मोठे अभिनेते; तरीही 20 कोटींच्या 'या' चित्रपटानं कशी केली 100 कोटींची कमाई

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उपलब्धतेमुळं जगाच्या पाठीवर असणारे कलेचे विविध प्रकार सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे विविधभाषी कलाकृतींना प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद.   

Oct 10, 2024, 15:11 PM IST

कलाकारांचा दमदार अभिनय आणि सहज-सोपं कथानक... पण ते मांडण्याची पद्धत मात्र अफलातून. माहितीये का हा चित्रपट? 

1/7

कमी खर्च

manjummel boys a movie without heroin collected 100 crores business

मागील काही दिवसांमध्ये किमान निर्मिती खर्चात साकारल्या जाणाऱ्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकपसंती मिळताना दिसली. 

2/7

दाक्षिणात्य कलाविश्व

manjummel boys a movie without heroin collected 100 crores business

'मंजुमल बॉईज' हा मल्याळम चित्रपटही त्यातलंच एक उदाहरण. या चित्रपटामुळं सध्या दाक्षिणात्य कलाविश्वावर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. 

3/7

सर्वायवल थ्रिलर

manjummel boys a movie without heroin collected 100 crores business

एक सर्वायवल थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन चिदंबरमनं केलं आहे. 

4/7

वेगळेपण

manjummel boys a movie without heroin collected 100 crores business

या चित्रपटात कोणताही मोठा कलाकार नाही किंवा लोकप्रिय अभिनेत्रीसुद्धा नाही. पण, तरिही चित्रपटाचं वेगळेपण टिकून आहे. 

5/7

कमाई

manjummel boys a movie without heroin collected 100 crores business

जवळपास 10 ते 12 नवख्या कलाकारांच्या साथीनं साकारण्यात आलेल्या या चित्रपटानं आतापर्यंत 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

6/7

बॉलिवूडशी तुलना

manjummel boys a movie without heroin collected 100 crores business

या चित्रपटाला मिळणारी लोकप्रिता आणि तो सादर करण्याची पद्धत पाहता खुद्द अनुराग कश्यप यानं अतिशय मोठं वक्तव्य करत मल्याळम चित्रपटाच्या तुलनेच बॉलिवूड मागे पडलं आहे, असं तो म्हणाला होता. 

7/7

सादर करण्याची प्रभावी पद्धत

manjummel boys a movie without heroin collected 100 crores business

दमदार कथानक आणि ते सादर करण्याची प्रभावी पद्धत यामुळं या चित्रपटाला मिळणारी लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. तुम्ही पाहिला का, हा चित्रपट?