Personality Test: लिपस्टिकच्या रंगावरुन ओळखा महिलांचा स्वभाव!
महिलांना व तरुणीला लिपस्टिक हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. लिपस्टिक लावल्यानंतर व्यक्तिमत्वात वेगळाच फरक दिसून येतो. आजकाल तर कमी वयातील मुलीदेखील लिपस्टिक लावताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का लिपस्टिक महिलांच्या स्वभावाबाबत तुम्ही अंदाज लावू शकता.
Mansi kshirsagar
| Oct 10, 2024, 14:39 PM IST
Lipstick Personality Test: महिलांना व तरुणीला लिपस्टिक हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. लिपस्टिक लावल्यानंतर व्यक्तिमत्वात वेगळाच फरक दिसून येतो. आजकाल तर कमी वयातील मुलीदेखील लिपस्टिक लावताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का लिपस्टिक महिलांच्या स्वभावाबाबत तुम्ही अंदाज लावू शकता.
1/7
Personality Test: लिपस्टिकच्या रंगावरुन ओळखा महिलांचा स्वभाव!
2/7
मुली लावतात त्या लिपस्टिकमुळं त्यांच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो. याबद्दल फार कमी जणांना माहिती असेल. प्रत्येक महिलेचे व तरुणीचे वेगळे व्यक्तीमत्व असते. बऱ्याचदा महिला व तरुणींना लिपस्टिक लावणे खूप आवडते. काही महिला गडद रंगाच्या किंवा लाइट रंगाच्या शेड्स लावतात. त्यांची ही पसंतच त्यांच्या व्यक्तीमत्वाचे रहस्य उघड करतात. त्याबद्दलच आज आपण जाणून घेऊया.
3/7
ज्या मुलींना लाल रंगाची लिपस्टिक जास्त आवडते. त्यांच्यात आत्मविश्वास दिसून येतो. ती महिला महत्त्वकांक्षी असते. तसंच, अनेकदा ती अॅग्रेसिव्ह आणि डिफेंसिव्ह होऊ शकते. लाल लिपस्टिक लावणाऱ्या तरुणी आणि महिलांना त्यांची ताकद आणि कमजोरींबद्दल माहिती असते. तसंच, या महिलांना तिच्या कुटुंबावर किंवा जवळच्या व्यक्तींवर पैसे खर्च करणे आवडते.
4/7
काही मुलींना न्यूड रंगाची लिपस्टिक लावायला आवडते. यावरून समोरची मुलगी क्लासिक आणि सोफिस्टिकेटेड असल्याचे दिसून येते. न्यूड लिपस्टिक लावणाऱ्या महिला या लाजाळू स्वभावाच्या असतात. त्यांना थोडं अलिप्त राहायला आवडतं. न्यूड रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या स्त्रिया तुम्हाला गर्विष्ठ किंवा कठोर वाटू शकतात, पण खरं म्हणजे त्यांचा स्वभाव फार मृदू असतो. न्यूड रंगाची लिपस्टिक लावणाऱ्या महिलांना डाउन-टू-अर्थ राहायला आवडते. त्या आयुष्याबाबत खूप प्रॅक्टिकल असतात. तसंच त्यांना लोकांमध्ये राहायला आवडते.
5/7
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की बहुतेक मुलींबद्दल असे म्हटले जाते की त्यांना गुलाबी रंग खूप आवडतो. जर तुमचा पार्टनर किंवा गर्लफ्रेंड गुलाबी रंगाची लिपस्टिक लावत असेल तर, ती लहान मुलांप्रमाणे आहे. अशा मुली खूप उत्साही असतात. ज्या मुलींना गुलाबी रंगाची लिपस्टिक आवडते त्यांना पार्टी करायला आणि मित्रांमध्ये मिसळायला आवडते. त्या खूप लवकर मित्र बनवतात. त्या साहसी असतात. या मुलींना नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला, नवीन लोकांना भेटायला आणि नवीन गोष्टी शिकायला आवडतात.
6/7