Mahila Naga Sadhu : महिला नागा साधू बनण्याचे नियम काय, त्या काय खातात आणि कुठे राहतात? जाणूया त्यांच्या रहस्यमय जगाबद्दल
Female Naga Sadhu: कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. नागा साधूंशिवाय कुंभमेळ्याची कल्पनाही करता येत नाही. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील या कुंभमेळ्यात सहभागी होतीत. महिला नागा साधूंबाबत जाणून घ्या या माहित नसलेल्या गोष्टी.
Mahila Naga Sadhu Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभमेळा सुरू झाला आहे आणि तो 26 फेब्रुवारी रोजी संपेल. यावेळी सुमारे 40 कोटी भाविक गंगा-यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभात सहभागी होऊ शकतात. महाकुंभात, संगमात पवित्र स्नान करण्यासाठी दूरदूरहून मोठ्या संख्येने संत आणि ऋषी येत आहेत.
प्रत्येक वेळी, कुंभमेळ्याला येणारे नागा साधू लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू राहतात. नागा साधूंशिवाय कुंभमेळ्याची कल्पनाही करता येत नाही. कुंभमेळ्यात अघोरी आणि नागा साधूंबद्दल नेहमीच चर्चा होते. नागा साधूंचा पोशाख आणि खाण्याच्या सवयी सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील आहेत.