Makar Sankranti Ukhane : हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ...! एकशे एक असे ट्रेडिंग स्पेशल मराठी उखाणे

Haldi Kunku Special Marathi Ukhane : मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. सुवासिनी महिला हळदी कुंकूमध्ये अहोचं नाव उखाण्यामध्ये घेतात.  आम्ही तुमच्यासाठी खास मराठी ट्रेंडिंग उखाणे आणले आहेत. 

| Jan 13, 2025, 14:37 PM IST
1/7

ऊसापासून बनवतात साखर आणि गूळ …. रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तिळगूळ  

2/7

मकरसंक्रातीला उडवतात उंच उंच पतंग ……. रावांचे नाव घेताना मनात उठतात तरंग  

3/7

माहेर माझे बागायती, बागेत पिकल्या केळी सासरी नांदत ….. रावांचे नाव घेत मकरसंक्रांतीच्या वेळी 

4/7

मकरसंक्राती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला ……. रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला  

5/7

हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध …… रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मींचे दृढ बंध  

6/7

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला ……. रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला  

7/7

सासरची माणसं माझ्या आनंदी आणि हौशी ….. रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी