AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

Mahesh Manjrekar: सध्या AI फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे सर्वचजण आपल्या फोटोंवर प्रयोग करताना दिसतात. सध्या महेश मांजरेकरांनीही हा प्रयोग करून पाहिला आहे. त्यांचा AI मधला डॅशिंग लुक तुम्ही पाहिलात का? 

गायत्री हसबनीस | Aug 06, 2023, 19:26 PM IST

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आहेत. ते आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जातात. सध्या AI फोटोंचा जमाना आहे. त्यामुळे सध्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली असते. महेश मांजरेकरांचाही असा एक हटके AI फोटो व्हायरल झाला आहे. त्यांनी त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवरून हा फोटो शेअर केला आहे. 

1/5

AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

actor

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे लोकप्रिय आहेत. त्यांच्या अभिनयाचे आणि चित्रपटांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. सोशल मीडियावरही ते चांगलेच सक्रिय असतात.  

2/5

AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

ai photos

सध्याचा जमाना आहे तो म्हणज AI च्या फोटोंचा. अशाच एक हरहुन्नरी कलाकारानं खुद्द महेश मांजरेकर यांचा एक AI फोटो तयार केला आहे. हा पाहून तुम्हीही हेच म्हणाल की आयनंही महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व अचून हेरलं आहे. 

3/5

AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

news

याबाबत महेश मांजरेकर यांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, एआयच्या गावात. माझा असा लूक असावा अशी माझी इच्छा होतीच. सर्व खलनायकांची भागमभाग.'' ज्यानं हा फोटो बनवला आहे त्याला म्हणजेच @haxanabdullah ला टॅग करून ‘तू सॉलिड आहेस' असं लिहिलं आहे. 

4/5

AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

trending

महेश मांजरेकरांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्चा पाऊस पाडला आहे. 'कडक सर' अशी अमृता खानविलकरनं कमेंट केली आहे. अभिजित खांडकेकरनं 'स्वॅग' अशी कमेंट केली आहे. 

5/5

AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

viral

‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘एका काळेचे मणी’ ही मराठी वेबसिरिजही त्यांची काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाली होती. ज्यात अभिनेते प्रशांत दामलेही होते.