Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, दर वर्षी मिळणार 6 हजार रुपये

Maharashtra Budget 2023: राज्याचा  सन 2023-24 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आज सादर  केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थमंत्री म्हणून पहिला बजेट मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी घोषणा केलीय. शेतकऱ्यांसाठी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेची घोषणा करण्यात आलीय.  

Mar 09, 2023, 20:11 PM IST
1/7

'नमो शेतकरी महासन्मान निधी' अंतर्गत केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देणार आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता दर वर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. 

2/7

शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना (Transformer Yojna) मिळणार आहे, यातून प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या पुरविल्या जातील.

3/7

विदर्भ-मराठवाड्यातील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांसाठी योजना, शेतकऱ्यांना धान्याऐवजी 1800 रुपये मिळणार

4/7

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

5/7

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीही राज्य सरकारची मोठी योजना, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये अनुदान मिळणार

6/7

'मागेल त्याला शेततळे' योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात येणार आहे. मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर. या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार

7/7

 शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा