1 जूनपासून 'या' गोष्टी होणार महाग; सर्वसामान्यांचं बजेट बिघडणार

Changes from 1 June: 1 जूनपासून होणाऱ्या बदलांचा भार थेट तुमच्या खिशावर पडणार आहे. एलपीजी सिलेंडरची किंमतीत होणाऱ्या बदलांमुळे तुमच्या महिन्याचं बजेट प्रभावित होणार आहे. याशिवायही अनेक बदल होणार आहेत.   

Shivraj Yadav | May 28, 2023, 12:53 PM IST
1/6

Changes from 1 June

Changes from 1 June: मे महिना आता संपायला आला आहे. जून महिना सुरु होणार असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात काही महत्त्वाचे बदल होत असतात.   

2/6

Changes from 1 June

Changes from 1 June: 1 जूनपासून देशात अनेक नवे बदल होणार आहेत. याचा प्रभाव थेट तुमच्या खिशावर पडणार आहे. हे बदल नेमके काय आहेत आणि त्यामुळे तुमच्या बजेटवर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्या. तुमच्या स्वयंपाकघरातील सिलेंडरच्या किंमतीत पेट्रोलियम कंपन्या बदल करु शकतात. याशिवायही अनेक महत्त्वाचे बदल होणार आहे.   

3/6

Changes from 1 June

LPG च्या किंमतीत बदल होण्याची शक्यता सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकघरातील गॅसच्या किंमतीत बदल करत असतात. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG गॅसच्या किंमती ठरवल्या जातात. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घट झाली होती. पण 14 किलोच्या घरगती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नव्हते. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची घट झाली होती. 

4/6

Changes from 1 June

CNG-PNG च्या किंमतीत बदलांची शक्यता घरगुती गॅस सिलेंडरप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला CNG-PNG च्या किंमतीत बदल होतात. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांत CNG-PNG च्या किंमतीत बदल करतात. एप्रिल महिन्यात दिल्ली आणि मुंबईत CNG-PNG च्या किंमतीत घट झाली असून, मे महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणताही बदल करण्यात आला नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या नजरा याकडे असून किंमतीत बदल केली जाण्याची शख्यता आहे. 

5/6

Changes from 1 June

इलेक्ट्रिक वाहनं महागणार 1 जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी महागणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 1 जूननंतर इलेक्ट्रिक दुचाकी खरेरीद केली तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 21 मे रोजी जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II अनुदान राशीत बदल केले आहेत. हा राशी कमी करुन 10,000 रुपये प्रती kWH केली आहे. आधी ही रक्कम 15,000 होती. यामुळे अनेक इलेक्ट्रिक गाड्या 25 ते 35 हजाराने महाग होऊ शकतात. 

6/6

Changes from 1 June

रिझर्व्ह बँकेची मोहीम 1 जूनपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांमध्ये जमा असलेल्या Unclaimed म्हणजेच कोणीही दावेदार नसणाऱ्या पैशांसंबंधी मोहीम चालवणार आहे. या मोहिमेचं नाव '100 दिवस 100 पेमेंट' असं आहे. आररबीआयने बँकांना सांगितलं आहे की, या मोहिमेअंतर्गत 100 दिवसांत अनक्लेम्ड अमाऊंट सेटल केली जाईल.