लोणारचे दैत्यसूदन मंदिर: सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून थेट पायापर्यंत घालते अभिषेक; अद्भूत नजारा
Lonars Daityasudana Temple: स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी 11.10 ते 11.30 मिनिटे या वेळेपुरतीच मर्यादित आहे.
Lonars Daityasudana Temple: उल्कापाताने तयार झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे आपण लोणारला ओळखतो. पण सरोवराच्या परिसरात इतरही पौराणिक वास्तु आणि मंदिर बांधलेली आहेत. त्यापैकी आपण दैत्यसूदन मंदिर पाहिलंय का? तर हो हे दैत्यसूदन मंदिर देखील या लोणार नगरीची मोठी ओळख आहे. आणि गेल्या दोन दिवसांत तर चक्क सूर्याने या मंदिराला प्रकाशात आणले.. ते कसे पाहूया...