महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान सुरु, या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्प्यातील मतदान आज होतंयय या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांसह देशातील एकूण 49 जागांवर मतदान सुरु आहे. पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. यात राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढाई होणार आहे. मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय ते मुंबईतल्या लढतींकडे. राज्यात निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे. मतदार नेमका कुणाला कौल देतात हे 4 जूनलाच समजणार आहे.

| May 20, 2024, 09:35 AM IST
1/13

दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात मुख्य लढत आहे.

2/13

दक्षिण मध्य मुंबईत मातोश्रीच्या दोन आजी-माजी निष्ठावंतात थेट लढत आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे; तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात आहे. 

3/13

उत्तर पश्चिम मुंबईत या मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत आहे. 

4/13

परंपरागत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना निवडणूक मैदानात उतरवलंय. तर काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिलीय...

5/13

उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम विरुध्द काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत रंगली आहे. या मतदारसंघात दलित, मुस्लिम मते निर्णायक आहेत. 

6/13

ईशान्य मुंबईत भाजपचे मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यात मुख्य लढत आहे.  संजय दिना पाटील भाजपचा बालेकिल्ला भेदणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

7/13

ठाण्यात दिवंगत आनंद दिघे यांच्या दोन निष्ठावंतांमध्ये लढत आहे.. शिवसेना शिंदेंचे नरेश म्हस्केंना ठाकरे गटाच्या राजन विचारेंचं आव्हान आहे... 

8/13

तर कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर रिंगणात उभ्या आहेत.. 

9/13

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील,  महाविकास  आघाडीचे  सुरेश म्हात्रे  आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघांमध्ये सामना रंगतोय.

10/13

पालघरमध्येही भाजपचे डॉ. हेमंत सावरा, ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बहूजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळतेय.

11/13

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदेंचे उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंनी आव्हान उभं केलंय. तर अपक्ष उभे असणारे शांतीगिरी महाराज किती मतं खेचतात यावर निकाल अवलंबून आहे.. 

12/13

दिंडोरीमधल्या कांदापट्ट्यात भाजपची कसोटी लागलीय. भाजपच्या डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे या दोघांतच खरा सामना होत आहे. 

13/13

धुळ्यात भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत आहे...