Life Extension: मृत्यूनंतरही जिवंत होण्याची इच्छा! तंत्रज्ञानासह भविष्याबाबत आश्चर्यकारक दावा

Life After Death: मृत्यूनंतर जीवन शक्य आहे का? याचे अचूक उत्तर कोणाकडेही नाही. असं असूनही भविष्यात असे घडेल या आशेने शेकडो लोक कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये आणि मेंदू सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ 65 लाख रुपये शुल्क आहे. आतापर्यंत जगभरातील 500 हून अधिक लोकांनी त्यांच्या शरीराचे क्रायोप्रिझर्व केले आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापैकी 300 हून अधिक मृतदेह फक्त अमेरिका आणि रशियामध्ये ठेवण्यात आले आहेत.

Dec 02, 2022, 17:06 PM IST
1/9

cryonics technology

माणूस चंद्रावर पोहोचला असून मंगळावर पोहोचण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे, आयुर्मान वाढवणं आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय शास्त्रही सातत्याने प्रयोग करत आहे. मात्र अजूनही यश मिळालेलं नाही. असं असताना जगात मृतदेह प्रिझर्व करण्याची प्रक्रिया काही कंपन्यांकडून सुरु आहे. या तंत्राला क्रायोनिक्स तंत्र असे नाव देण्यात आलं आहे. 

2/9

cryonics technology

जगभरात, 500 हून अधिक लोकांचे मृतदेह क्रायोप्रिझर्व्ह केलेले आहेत. म्हणजेच हे लोक कायदेशीररित्या मेले असले तरी क्रायोनिक्स तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ते बेशुद्ध झाले आहेत. 

3/9

cryonics technology

ब्रिटन, रशिया, अमेरिका आणि इतर अनेक देशांतील काही लोकांनी कंपनीशी करार केला आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ रिचर्ड गिब्सन यांच्या मते, मृत्यूनंतर या व्यक्तींचे मृतदेह फ्रीझरमध्ये या आशेने ठेवले जातील की भविष्यात विज्ञानाने आणखी प्रगती केली तर त्यांना पुन्हा जीवन मिळेल. 

4/9

cryonics technology

ऑस्ट्रेलियन कंपनी सदर्न क्रायोनिक्सने दावा केला होता की, -200 डिग्री सेल्सिअस तापमानात मानवी मृतदेहांचे संरक्षण करते. भविष्यात एखादं तंत्रज्ञान विकसित झालं तर मृतदेह बाहेर काढून जिवंत करता येईल. 

5/9

cryonics technology

2016 मध्ये, एका कर्करोग रुग्णाने लंडन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की, ती मरणार आहे. त्यामुळे पुन्हा जगण्याचा हक्क मिळायला हवा. भविष्यात मृतदेह जिवंत करण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल, असा विश्वास तिच्या कुटुंबीयांना होता. त्यामुळे मृतदेह जतन करण्याची परवानगी मागितली होती.

6/9

cryonics technology

अत्यंत कमी तापमान आणि लिक्विड नायट्रोजनच्या सहाय्याने अशा प्रकारे मृतदेहांचे जतन केले जाते. इंडियन फ्युचर सोसायटीच्या मते, भारतात मृतदेह जतन करण्याचा कायदा नाही. तसेच न्यायालय आणि सरकारकडून परवानगी मिळणे फार कठीण आहे.

7/9

cryonics technology

थायलंडमधील मॅथ्रिन नवरतपोंग, या दोन वर्षीय मुलीचा मेंदुच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. 2015 मध्ये तिला क्रायोप्रीझर्व करण्यात आलं. तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर होते. पण तिला वाचवू शकले नाहीत. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्यानं लोकांना आयुष्यात दुसरी संधी मिळेल या आशेने संस्था सुरु करण्याचा विचार केला होता, असं एल्कोर कंपनीचे सीईओ मॅक्स मोर यांनी रॉयटर्सला सांगितलं.

8/9

cryonics technology

'मेट्रो यूके'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सदर्न क्रायोनिक्स आणि एल्कोर यांसारख्या कंपन्यांनी भविष्यात मृत्यूनंतर जगणे शक्य होईल का, या प्रश्नाला तोंड फोडले आहे. 

9/9

cryonics technology

या विचारामुळे लोकांमध्ये त्यांचा मृतदेह जपण्याचा ट्रेंड वाढला आहे. दुसरीकडे, क्रायोनिक्सच्या विरोधक मिरियम स्टॉपर्ड यांनी सांगितले की अशा कल्पना अवास्तव आहेत.