फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात बियर बॉटल?

तुम्ही बियर पित नसलात तरी तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला असू शकतो की बियरच्या बॉटलचा रंग हा हिरवा किंवा तपकिरीचा का? पण या मागचं नेमकं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Diksha Patil | Nov 18, 2024, 17:52 PM IST
1/7

बियरच्या बॉटलचा रंग हा पांढरा किंवा दुसरा कोणता का नसून फक्त हिरवा आणि तपकिरी का असतो? असा प्रश्न हा सगळ्यांनाच कधी ना कधी पडलेला असतो.

2/7

सगळ्यात आधी बियर ही इजिप्तमध्ये बनवण्यात आली होती. इथे सगळ्यात आधी तर बियरला ट्रान्सपरेंट बॉटेलमध्ये देण्यात येत होती. पण त्यानंतर अचानक बियर खराब होऊ लागली.

3/7

त्यांच्या लक्षात आलं की सूर्याच्या प्रकाशामुळे त्या बियर बॉटेलमध्ये असलेलं अ‍ॅसिड हे  सुर्याच्या अल्ट्रा वायलेट रेजमुळे पटकन रिजेक्ट व्हायच्या. यामुळे ती बियर प्यायल्यानं आरोग्यावर काही तरी दुसराच परिणाम होऊ लागले आणि त्यामुळे लोकांनी बियर पिणं सोडून दिलं. 

4/7

लोकांनी बियर पिणं सोडून दिल्यानं कंपण्यांचं नुकसान होऊ लागलं. तेव्हा त्यावर उपाय म्हणून बऱ्याच गोष्टी शोधल्या, पण कोणताच फायदेशीर ठरला नाही. म्हणून त्यांनी बॉटलला तपकिरी रंगाची कोटींग करण्यास सुरुवात केली. 

5/7

हा उपाय फायदेशीर ठरला आणि तपकिरी रंगाच्या बॉटेलमध्ये ठेवण्यात आलेली बियर खराब झाली नाही. यामुळे कंपन्या आणि बियर पिणाऱ्यांना आनंद झाला पण त्यांचा आनंद हा जास्त काळ टिकून राहिला नाही.

6/7

काही काळानंतर आणखी एक समस्या समोर आली आणि ती म्हणजे दुसरं महायुद्ध झालं आणि त्यानंतर बियर कंपनीसमोर आणखी एक समस्या उभी राहिली. त्यावेळी या रंगाची बॉटल मिळत नव्हत्या. 

7/7

त्यामुळे बियर कंपनीनं दुसऱ्या रंगाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हिरव्या रंगापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे त्यालाच निवडलं. तेव्हापासून बियरच्या बॉटलचा रंग हा हिरवा किंवा तपकिरीच असतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)