माधुरी दिक्षित पासून करिश्मा कपूर पर्यंत 90व्या शतकात 'या' 7 अभिनेत्री घ्यायच्या इतके मानधन

90च्या दशकात 'या' अभिनेत्रींचे चित्रपट मोठ्या पडद्यावर खूपच धुमाकूळ घालायचे. पण तुम्हाला माहितये का, या अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती  मानधन घेत होत्या. त्यांचे मानधन ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल, तर चला पाहूयात कोण होत्या या अभिनेत्री

Intern | Nov 18, 2024, 16:38 PM IST

माधुरी दिक्षित पासून करिश्मा कपूर पर्यंत 90व्या शतकात 'या' 7 अभिनेत्री घ्यायच्या इतके मानधन

1/7

1. प्रिती झिंटा

प्रिती झिंटा 90व्या दशकात एका चित्रपटासाठी 30 लाख मानधन घ्यायची. ही अभिनेत्री आता चित्रपटसृष्टीपासून लांब आहे पण सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे फोटोज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  

2/7

2. माधुरी दिक्षित

90व्या दशकात सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दिक्षित. माधुरी एका चित्रपटाचे तब्बल 50 लाख ते 1 कोटी मानधन घ्यायची.

3/7

3.जुही चावला

जुही चावला ही त्यावेळेसची टॉपची अभिनेत्री मानली जायची. हीने अनेक बॉलिवूड चित्रपट केले. 'कयामत से कयामत तक'या चित्रपासून तिने चित्रपटात पदार्पण केले. या नंतर तिने 'डर' , 'लोफर' , 'इश्क' यांसारखे  हिट चित्रपट दिले. जुही चावला 1990 ते 1992च्या कालावधीत प्रत्येक चित्रपटासाठी 10 लाख मानधन घ्यायची पण या चित्रपटानंतर ती 25 लाख ते 40 लाख एवढे मानधन घ्यायला लागली   

4/7

4.रवीना टंडन

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही 90व्या दशकाप्रमाणेच आताही अनेक वेब सीरिज आणि चित्रपट करते . रवीना टंडन ९०व्या दशकात एका चित्रपटासाठी 25 लाख मानधन घेत असत.   

5/7

5.काजोल

काजोल सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपला जलवा दाखवतेय. परंतू हीचं अभिनेत्रीला 90व्या दशकातल्या 'दिल वाले दुल्हनिया ले जयेंगे'या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाळी. काजोलने या  चित्रपटांनंतर 50-70 लाख मानधन घेण्यास सुरुवात केली. 

6/7

6.श्रीदेवी

श्रीदेवी या एका चित्रपटासाठी 60 लाख ते 1 कोटी एवढे मानधन घ्यायच्या. श्रीदेवीला बॉलिवूडची लेडी सुपरस्टार देखील म्हटले जायचे.   

7/7

7.करिश्मा कपूर

करिश्मा कपूर ही तेव्हाची प्रसिद्ध अभिनेत्री होती. ती एका चित्रपटासाठी जवळपास 50-70 लाख मानधन घ्यायची. तिने तेव्हा एका मागोमाग एक हिट चित्रपट दिले . त्यानंतर तिची फिज 1 कोटी झाली होती .