Business Idea: सरकार देतयं 85% सब्सिडी, लवकरच करा हा Solid business! कराल लाखोंची कमाई

सरकारची 'या' सब्सिडीमुळे तरुण उद्योजकांना मिळेल सोन्याची संधी  

Dec 02, 2022, 16:57 PM IST

Business Idea: सध्या लोक एकाच नोकरीवर अवलंबून राहत नाही. तुम्हालाही नोकरीच्या अस्थिरतेत तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या व्यवसायाबद्दल (Small Business Idea) सांगत आहोत जो तुम्ही सहज सुरू करू शकता आणि लाखांत कमवू शकता. हा व्यवसाय आहे - मधमाशी पालन व्यवसाय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी देखील देते. चला या व्यवसायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

1/5

BEST BUSINESS IDEA, NEW BUSINESS IDEA, BEEKEEPING BUSINESS, HOW TO START BUSINESS, AGRICULTURE BUSINESS IDEAS

मधमाशीपालन करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. मधमाश्या गोळा करून त्यापासून बनवलेले मध व मेण विकून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. मधमाशीपालनामध्ये शेती आणि फळबाग उत्पादन वाढवण्याची क्षमता आहे. आणि त्यामुळेच या व्यवसायासाठी सरकारही मदत करत आहे.

2/5

BEST BUSINESS IDEA, NEW BUSINESS IDEA, BEEKEEPING BUSINESS, HOW TO START BUSINESS, AGRICULTURE BUSINESS IDEAS

सर्वप्रथम व्यावसायिक संघटनांकडून माहिती घ्यावी. याशिवाय मधमाशांचे स्थान आणि तुमच्या परिसरात कोणत्या प्रकारचे मधाचे उत्पादन केले जाते याची माहिती मिळवा. आता तुम्ही पहिल्या कापणीनंतर मधमाशी पालनाच्या कामाचे मूल्यांकन करा. याशिवाय, आपल्या मधमाश्या आणि पोळ्यांचे आरोग्य तपासत रहा. मधमाशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीसाठी तुमच्या राज्य महसूल विभागाशी संपर्क साधा. यातून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.

3/5

BEST BUSINESS IDEA, NEW BUSINESS IDEA, BEEKEEPING BUSINESS, HOW TO START BUSINESS, AGRICULTURE BUSINESS IDEAS

मधमाशांपासून मधाशिवाय तुम्ही या व्‍यवसायांतर्गत इतरही अनेक उत्‍पादने तयार करू शकता. यामध्ये मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा बीस गम आणि बी परागकण यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने मानवांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि बाजारात त्यांची किंमत खूप आहे. म्हणजेच यामध्ये तुम्ही अनेक प्रकारे पैसे कमवू शकता.  

4/5

BEST BUSINESS IDEA, NEW BUSINESS IDEA, BEEKEEPING BUSINESS, HOW TO START BUSINESS, AGRICULTURE BUSINESS IDEAS

विशेष म्हणजे, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 'पीक उत्पादकता सुधारण्यासाठी मधमाशी पालनाचा विकास' नावाची केंद्रीय योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत क्षेत्राचा विकास, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवणे यांचा समावेश आहे.

5/5

BEST BUSINESS IDEA, NEW BUSINESS IDEA, BEEKEEPING BUSINESS, HOW TO START BUSINESS, AGRICULTURE BUSINESS IDEAS

राष्ट्रीय मधमाशी मंडळाने नाबार्डच्या सहकार्याने भारतात मधमाशी पालन व्यवसायासाठी फायदेशीर योजना आखल्या आहेत. या क्षेत्रात महिलांना रोजगार मिळावा यासाठी सरकारही तयार आहे. यासाठी तुम्ही जवळच्या राष्ट्रीय मधमाशी मंडळाशी संपर्क साधू शकता. मधमाशी पालनावर सरकार 80-85 टक्के अनुदान देते.