सचिन तेंडुलकरचा मुंबईतील बंगला आतून कसा आहे? आलिशान घराचे Inside Photos पाहून डोळे फिरतील
भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची एकूण संपत्ती ही काही हजार कोटी आहे. सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो. तेव्हा सचिनच्या या आलिशान घराचे Inside Photos पाहूयात.
Pooja Pawar
| Nov 18, 2024, 16:51 PM IST
1/7
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित क्रिकेटर सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये वॉर्डन कुटुंबाकडून हा बंगला जवळपास 39 कोटींना विकत घेतला. सचिनचं हे घर 6000 स्क्वेअर फूटचं असून ते खूपच आलिशान आहे. सचिनच्या घराला अनेक मजले असून याचा दोन बेसमेंट सुद्धा आहेत. घरातच सुंदर गार्डन सुद्धा असून त्यात जगभरातील अनेक सुंदर आणि खास झाड आहेत.
2/7
सचिन तेंडुलकरने 15 नोव्हेंबर रोजी 1989 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 24 वर्ष क्रिकेट खेळून अनेक रेकॉर्डस् नावावर केल्यावर 14 नोव्हेंबर 2013 मध्ये सचिनने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34357 धावा केल्या असून त्याच्या या वर्ल्ड रेकॉर्डला मोडणं जवळपास अशक्यच आहे.
3/7
4/7
5/7
6/7
कार पार्किंग :
सचिन तेंडुलकरच्या बंगल्यातील बेसमेंटमध्ये कार पार्किंग आणि गॅरेज असून त्याच्याकडे मारुती सुझुकी 800, BMW X5M, BMW 7-Series 750L, BMW M6 ग्रॅन कूप, BMW M5 30 Jahre, BMW i8, Nissan GT-R Egoist, Ferrari 360 Modena, Fiat car, Mercedes-Benz C36 AMG इत्यादी आलिशान गाड्यांचा समावेश आहे. सचिनचं हे कार कलेक्शन कोट्यवधींच्या घरात आहे.
7/7