IPL 2020 : मुंबईच्या क्रिकेटपटूंची 'लाडाची लेक गं'

काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात सुरु झालेल्या IPL 2020 आयपीएल क्रिकेट सामन्यांची रंगत दिवसागणिक वाढत असतानाच, या स्पर्धेसाठी दमदार खेळीचं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंच्या मुलींनी सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. यासाठी निमित्त ठरलं ते म्हणजे मुंबईच्या संघकडून पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडिओ. 

Sep 28, 2020, 18:43 PM IST

1/5

IPL 2020 : मुंबईच्या क्रिकेटपटूंची 'लाडाची लेक गं'

Daughter’s Day च्या निमित्तानं मुंबईच्या संघाकडून खेळाडूंच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान असणाऱ्या त्यांच्या मुलींची सर्वांनाच भेट घडवून आणली. यामध्ये महेला जयवर्धने याचं आणि त्याच्या मुलीचं नातंही सर्वांसमोर आलं. 

2/5

IPL 2020 : मुंबईच्या क्रिकेटपटूंची 'लाडाची लेक गं'

आदित्य तरे यानंही त्याच्या मुलीसोबतचं नातं नेमकं कसं आहे, हे सांगत ती आपल्यावरच जास्त प्रेम करते असं अतिशय विश्वासानं आणि विनोदी अंदाजात म्हटलं. एक वडील म्हणून यावेळी मुलीवरचं त्याचं प्रेम स्पष्टपणे पाहायला मिळालं. 

3/5

IPL 2020 : मुंबईच्या क्रिकेटपटूंची 'लाडाची लेक गं'

'खुप आनंदाची गोष्ट आहे की नितारा आमच्या आयुष्यात आली', असं मराठमोळ्या अंदाजात म्हणत धवल कुलकर्णी यानं आपल्या मुलीला क्रीडा क्षेत्रात सर्व स्तरांनी पुढे आणण्याचं स्वप्न यावेळी सर्वांपुढे आणलं. 

4/5

IPL 2020 : मुंबईच्या क्रिकेटपटूंची 'लाडाची लेक गं'

तुफानी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑलराऊंडर कायरन पोलार्ड यानंही आपल्या मुलीचं आपल्या जीवनात नेमकं काय स्थान आहे, हे Daughter’s Day च्या निमित्तानं सर्वांनाच सांगितलं. 

5/5

IPL 2020 : मुंबईच्या क्रिकेटपटूंची 'लाडाची लेक गं'

मुंबईच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं मुलीच्या जन्मानंतर जीवनात झालेले बदल अधोरेखित केले. ती मला आनंदात ठेवते, आनंदी विश्वात रममाण करते असं म्हणत रोहितमध्ये दडलेला 'बाबा' यावेळी दिलखुलासपणे बोलला. (सर्व छायाचित्रे सौजन्य- ट्विटर)