Google Meetचा मोठा निर्णय; फ्री व्हर्जन अनलिमिटेड व्हिडिओ मिटिंगवर मर्यादा

मार्च महिन्यापासून फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ऑनलाईन व्यवस्थेवर भर पडत आहे.  

Sep 28, 2020, 13:02 PM IST

कोरोना काळात अनेक मोठ्या कंपन्यांमधील कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. शिवाय शिक्षण व्यवस्थादेखील ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे Google Meetचा वापर चांगलाच वाढला आहे. मार्च महिन्यापासून फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ऑनलाईन व्यवस्थेवर भर पडत आहे. अशात Google Meetने एक मोठा निर्णय घेतला आहे. Google Meet फ्री व्हर्जनवर आता युजर्सना अनलिमिटेड व्हिडिओ मिटिंग करणं शक्य होणार नाही. 

 

1/5

Google Meetसाठी कंपनीने सप्टेंबरपासून नवीन मर्यादा निश्चित केली आहे. Google Meet फ्री व्हर्जनसाठी कंपनीने ६० मिनिटांचा कालावधी निश्चित केला आहे.   

2/5

३० सप्टेंबरपूर्वी याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण यादरम्यान अनेक लोक घरून आपली सर्व कामे पूर्ण करत होते. ३० सप्टेंबरपर्यंत युजर Google Meetवर १०० लोकांसह अनलिमिटेड मिटिंग करू शकतात.   

3/5

गूगल प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रोमो आणि इतर प्रगत फिचर संबंधी सांगण्यासाठी आमच्याकडे अधिक माहिती नाही. यासंबंधी काही असल्यास आम्ही सांगू. अशी प्रतिक्रिया गूगलच्या प्रवक्त्यांनी दिली.   

4/5

Meet appच्या फ्री व्हर्जनसोबतच कंपनीने G Suite आणि G Suite for Education फिचर देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

5/5

कोरेना व्हायरसमुळे या ऍपला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.  Google Meet सोबतच झूम (ZOOM) आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams)हे App देखील नावारूपाला आले.