हिवाळ्यात खूप थकवा आणि आळस येतो? फॉलो करा 5 सोप्या टिप्स, राहाल ऊर्जावान

Winter Health Tips : हिवाळ्यात लोकांना जास्त आळस आणि थकवा येतो. थंडीमुळे अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही तसेच बऱ्याच जणांना एनर्जीची कमतरता भासते. तेव्हा आलेला थकवा आणि आळस दूर करण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता. 

| Dec 22, 2024, 12:02 PM IST
1/7

हिवाळ्यात थकवा जाणवणे ही एक सामान्य समस्या असून यामागे एनर्जीची कमतरता, थंडीमुळे ब्लड सर्कुलेशन हळू होणे, कमी सूर्यप्रकाश इत्यादी कारण असू शकतात. पोषक आहाराचा अभाव आणि शारीरिक हालचाल कमी असणं इत्यादीही थकवा येण्याची प्रमुख कारण असू शकतात. 

2/7

व्यायाम आणि स्ट्रेचिंग :

हिवाळ्यात आळस आणि थकवा दूर करण्यासाठी नियमित व्यायाम आणि स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. सकाळच्यावेळी व्यायाम केल्याने शरीर गरम राहत आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. योग आणि स्ट्रेचिंगमुळे मांसपेशींना आराम मिळतो. रोज 20 ते 30 मिनट व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

3/7

संतुलित आहार :

हिवाळ्यात शरीराला एनर्जीची जास्त आवश्यकता असते. अशावेळी अंतुलित आहार घेणे गरजेचे ठरते. जेवणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबरने भरपूर असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. ओट्स, सुखा मेवा, सूप आणि सीजनल भाज्या जसे गाजर, पालक आणि रताळ इत्यादी तुमची एनर्जी वाढवण्यासाठी मदत करेल. तसेच तुम्ही आहारात संत्र, द्राक्ष अशा फळांचा देखील समावेश करू शकता. 

4/7

सूर्यप्रकाश :

 हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने बऱ्याचदा शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता निर्माण होते. म्हणून सकाळी 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशात थांबा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळतच परंतु यासोबत मूड देखील फ्रेश होतो.  व्हिटॅमिन D मुळे हाडं देखील मजबूत होतात. 

5/7

पाणी पिणे :

हिवाळ्यात थंडीमुळे अनेकदा पाण्याचे सेवन कमी केले जाते. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. डिहायड्रेशन शरीरात थकवा, आळस येतो. अशावेळी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देखील पुरेश्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. शिवाय तुम्ही गरम पाणी, हर्बल चहा किंवा सूप इत्यादींचे सेवन देखील करू शकता. 

6/7

मानसिक तणाव दूर होतो :

हिवाळ्यात मानसिक ताण येणं किंवा थकवा जाणवणं ही सामान्य गोष्ट आहे. तेव्हा मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही प्राणायाम, ध्यानधारणा करू शकता. यामुळे तणाव दूर होतोच मात्र डोकं देखील शांत राहत. तुम्ही रोज 10 ते 15 मिनिट नियमित प्राणायाम, ध्यानधारणा करू शकता. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)