रेल्वेने बाईक दुसरीकडे कशी पाठवायची? किती येतो खर्च? जाणून घ्या सर्वकाही

 रेल्वेच्या मदतीने बाईक आणण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही लगेज म्हणून बाईक सोबत घेऊ शकता.तुम्ही ट्रेनने प्रवास करत नसाल तर पार्सलद्वारे बाईक पाठवता येऊ शकेल. 

| Feb 13, 2024, 19:30 PM IST

How to send bike by Train: रेल्वेच्या मदतीने बाईक आणण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही लगेज म्हणून बाईक सोबत घेऊ शकता.तुम्ही ट्रेनने प्रवास करत नसाल तर पार्सलद्वारे बाईक पाठवता येऊ शकेल. 

1/11

रेल्वेने बाईक दुसरीकडे कशी पाठवायची? किती येतो खर्च? जाणून घ्या सर्वकाही

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

How to send bike by Train: भारतीय रेल्वे आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण तुम्हाला दुरवरच्या ठिकाणी रेल्वेने बाईक पाठवायची असेल तर कशी पाठवायची? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2/11

बाईक शहरात कशी आणायची?

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

गाव खेड्यातून शिक्षण, नोकरीसाठी तरुण मोठ्या प्रमाणात शहराकडे येतात. अशावेळी गावी असलेली बाईक शहरात कशी आणायची? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण हे अंतर इतक दूर असतं की गाडी चालवत आणणं शक्य नसतं. पण भारतीय रेल्वे तुम्हाला यासाठी मदत करेल. 

3/11

दोन पर्याय

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

रेल्वेच्या मदतीने बाईक आणण्यासाठी दोन पर्याय आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही लगेज म्हणून बाईक सोबत घेऊ शकता.तुम्ही ट्रेनने प्रवास करत नसाल तर पार्सलद्वारे बाईक पाठवता येऊ शकेल. 

4/11

पार्सलने बाईक कशी पाठवायची?

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

पार्सलद्वारे बाइक पाठवायची असेल तर तुम्हाला आगाऊ बुकिंग करावे लागेल.पार्सल बुक करण्यासाठी तुम्हाला रेल्वेच्या पार्सल कार्यालयात जावे लागेल.तुम्हाला तुमच्या बाईकच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या दोन छायाप्रती पार्सल कार्यालयात जमा कराव्या लागतील.

5/11

काय काळजी घ्याल?

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

बाईक पार्सल करण्यासाठी बुक करण्यापूर्वी, तिची पेट्रोल टाकी पूर्णपणे रिकामी असेल हे पाहा. बाईक पाठवताना, कार्डबोर्ड पुठ्ठ्यावर निघायचे आणि पोहोचायचे स्थानके स्पष्टपणे लिहा. बाईक पॅक केल्यानंतर हा पुठ्ठा घट्ट बांधून घ्या.

6/11

रेल्वेकडून फॉर्म

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

तुम्हाला रेल्वेकडून एक फॉर्म दिला जाईल. ज्यावर कंपनी, नोंदणी क्रमांक, वजन आणि किंमत असा बाईकचा तपशील भरा. तसेच या फॉर्मवर बोर्डिंग स्टेशन आणि डेस्टिनेशन स्टेशनचा तपशील भरा.

7/11

शुल्क प्रत्येक ट्रेननुसार

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

ट्रेनने पार्सलने बाइक पाठवण्याचे शुल्क प्रत्येक ट्रेननुसार बदलू शकते. गाड्या आणि अंतरानुसार हे शुल्क आकारले जाते. याशिवाय बाइकच्या वजनानुसार चार्जही बदलू शकतो. 

8/11

बाइकची किंमत सांगा

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

बाईक पार्सल करताना तुम्हाला बाइकची किंमत सांगावी लागेल. आणि त्यानुसार रेल्वेने निर्धारित केलेले शुल्क भरणे अनिवार्य आहे. तुम्ही पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला रेल्वेकडून बील दिले जाते. हे बील दुचाकीच्या डिलिव्हरीच्या वेळी दाखवणे आवश्यक आहे.

9/11

सामानासह बाईक कशी पाठवायची?

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही सामान म्हणून बाईकसोबत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ट्रेन येण्याच्या वेळेच्या अर्धा तास आधी स्टेशनवर पोहोचावे लागेल. बाईक पार्सलप्रमाणे स्टेशनवर व्यवस्थित पॅक करावी लागेल.

10/11

वैध तिकीट आवश्यक

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

बाइक बुक करण्यासाठी तुमच्याकडे ट्रेनने प्रवास करण्यासाठी वैध तिकीट असणे आवश्यक आहे. स्टेशनवरून सामान म्हणून बाइक घेऊन जाण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. त्यासाठी रेल्वेकडून बील दिले जाईल.

11/11

सामानाचे बील दाखवा

Indian Railway How to Transfer Bike from luggage Railway

ट्रेनमध्ये मोकळी जागा असल्यास तुम्ही बाईक सामानाच्या डब्यातून नेऊ शकता. गंतव्यस्थानी पोहोचल्यावर तिकीट आणि सामानाचे बील दाखवून बाईक तुमच्यासोबत नेऊ शकता.