Ayushman Card Benifits : आयुष्मान कार्डमुळे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ; योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

Ayushman Card : या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते  

Feb 13, 2024, 18:48 PM IST
1/7

आयुष्मान भारत योजना :

देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे.   

2/7

आयुष्मान भारत योजनेमुळे काय होतं?

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आखलेली योजना आहे.  या योजनेद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे.   

3/7

आयुष्मान भारत योजना केव्हा सुरु झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रधानमंत्री जन आरोग्य' योजनेची (आयुष्मान भारत योजना ) घोषणा केली आहे. ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर 2019 पासून देशभर लागू करण्यात आली. सरकार एबीवायच्या माध्यमातून गरीब, उपेक्षित कुटूंब व शहरी गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करणार आहे.

4/7

आयुष्मान भारत योजना कोणासाठी आहे?

केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे की, महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना एबीवाय योजनेत प्राधान्याने सामील करून घेतले जाईल. आयुष्मान भारत योजनेचा (एबीवाय) लाभ घेण्यासाठी कुटूंबाचा आकार व वयाचे कोणतेही बंधन नाही.  

5/7

ग्रामीण भागातील कोणती कॅटेगरीला होणार लाभ?

SECC च्या आकडेवारीनुसार आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) लोकांना आरोग्य विमा मिळत आहे. एसईसीसीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील D1, D2, D3, D4, D5 आणि D7 कॅटेगरीतील लोक आयुष्मान भारत योजनेत सामील करण्यात आले आहेत.  

6/7

शहरी भागातील कोणती कॅटेगरीला होणार लाभ?

शहरी भागात कामानुसार लोक आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत आधीपासूनच समाविष्ट लोक आपोआप आयुष्मान भारत योजनेचे लाभारती  झाले आहेत.

7/7

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय डोक्युमेंट गरजेचे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.