महाराष्ट्रातील 'या' शहरातून 45 शहरांना जोडणारा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे; खाली रस्ता तर वर अभयारण्य!

भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शहराला जोडणार आहे. 1386 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वेचं वैशिष्ट्य म्हणजे 5 प्रमुख वन्यजीव अभयारण्यांमधून या रस्त्याची बांधणी अशी केलीय की वर अभयारण्य तर खालून रस्ता जाणार आहे. या एक्स्प्रेस वेचं काम दोन महिन्यात पूर्ण होईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. याचा अर्थ नवीन वर्षात या एक्स्प्रेस वे प्रवास करता येऊ शकतो. 

नेहा चौधरी | Dec 15, 2024, 20:26 PM IST

India Longest Expressway : भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शहराला जोडणार आहे. 1386 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वेचं वैशिष्ट्य म्हणजे 5 प्रमुख वन्यजीव अभयारण्यांमधून या रस्त्याची बांधणी अशी केलीय की वर अभयारण्य तर खालून रस्ता जाणार आहे. या एक्स्प्रेस वेचं काम दोन महिन्यात पूर्ण होईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. याचा अर्थ नवीन वर्षात या एक्स्प्रेस वे प्रवास करता येऊ शकतो. 

1/7

1386 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वेमुळे मुंबई आणि दिल्ली हे भारतातील प्रमुख शहर जवळ येणार आहे. 24 तासांचा प्रवास या एक्स्प्रेस वेमुळे आता 12 तासांवर येणार आहे. या एक्स्प्रेस वेचं पहिल्या भागाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलंय. हा संपूर्ण एक्स्प्रेस वे नवीन वर्षात प्रवाशांसाठी खुला होणार आहे. हा फक्त देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे नाही तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. 

2/7

15,000 हेक्टर जमीनवर बांधण्यात येत असलेला हा एक्स्प्रेस वे 45 शहरांना जोडणार आहे. हा एक्स्प्रेस वे काही ठिकाणी डोंगरातून तर काही ठिकाणी जंगलातून जाणार आहे. 

3/7

सध्या आठ पदरी असलेला हा एक्स्प्रेस वे येत्या काही वर्षांत 12 लेनचा करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा आशियातील पहिला महामार्ग आहे ज्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी ग्रीन ओव्हरपासची सोय केली गेलीय.  

4/7

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर ताशी 120 किमी वेगाने वाहने धावणार आहेत. या मार्गावरील इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित करण्यात येत असून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेची पायाभरणी 9 मार्च 2019 रोजी करण्यात आली होती. त्याच्या बांधकामात 12 लाख टन स्टील वापरण्यात आले, जे 50 हावडा पुलांच्या बरोबरीचे आहे. त्याच्या बांधकामात 35 कोटी घनमीटर माती आणि 80 लाख टन सिमेंट वापरण्यात आले. एक्स्प्रेस वेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाहनांच्या इंधनाच्या वापरात 32 कोटी लिटरची कपात होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय.

5/7

हा आशियातील पहिला महामार्ग आहे ज्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी हिरवा ओव्हरपास देण्यात आलाय. यासाठी प्रत्येकी आठ लेनचे दोन बोगदे तयार करण्यात आलंय. जेणेकरून प्राणी एका बाजूने दुसऱ्या बाजूला सहज प्रवास करु शकणार आहेत. पहिला बोगदा राजस्थानमधील मुकुंदरा अभयारण्यात तर दुसरा महाराष्ट्रातील माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बांधला जात आहे. एक्स्प्रेस वेमुळे जनावरांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुकंद्रा आणि रणथंबोरमधून जाणाऱ्या भागाला सायलेंट कॉरिडॉर बनवण्यात आलंय. हा एक्स्प्रेस वे 5 मोठ्या वन्यजीव अभयारण्यांमधून जात असल्याने प्राण्यांना लक्षात घेऊन वाहनांचे हॉर्न आणि सायरनही बदलण्यात आले आहेत. या एक्स्प्रेस वेवर हॉर्नऐवजी सतार आणि शहनाईचे सूर वाजवले जाणार आहेत. 

6/7

या एक्स्प्रेस वेवर पेट्रोल पंप, मोटेल, रेस्ट एरिया, रेस्टॉरंट आणि दुकाने, एटीएम, पार्किंग, रिचार्ज स्टेशन, वसतिगृहे, रुग्णालये, फूड कोर्ट, इंधन केंद्रे अशा 94 प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. या संपूर्ण द्रुतगती मार्गावर 30 लेन टोलनाके उभारले जात आहेत. जेथे वाहनांची प्रतीक्षा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी असेल. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला 13 लाखांहून अधिक झाडे लावली जात आहेत. 

7/7

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर 12 हेलिपॅड बांधण्याची तयारी सुरू आहे, ज्याचा उपयोग वैद्यकीय आपत्कालीन आणि लष्करी कामासाठी केला जाईल. NHAI नुसार, सर्व 12 हेलिपॅड राजस्थानमध्ये बांधण्यात येत आहेत.