भाजपाचे सर्वाधिक 19 मंत्री; 16 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री; जाणून घ्या कशी आहे फडणवीसांची टीम; संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Cabinet Expansion Oath Ceremony: मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.   

Shivraj Yadav | Dec 15, 2024, 18:32 PM IST

Maharashtra Cabinet Expansion Oath Ceremony: मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

 

1/16

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.   

2/16

चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे

12 ऑगस्ट 2022 पासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, 2004 पासून नागपूरच्या कामठी मतदारसंघाचे आमदार, 2014 ते 2019 दरम्यान राज्याचे ऊर्जा, उत्पादन, शुल्क मंत्री होते.  

3/16

राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा असा राजकीय प्रवास, 1995 पासून सलग 8 वेळा विधानसभेवर, महसूल, कृषी, जलसंधारण, पदुम खात्यांचा अनुभव  

4/16

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

2007 ते 2010 दरम्यान भाजपाचे सरचिटणीस, 2010 ते 2015 प्रदेश उपाध्यक्ष, 2008 ते 2019 विधान परिषदेवर आमदार

5/16

गिरीश महाजन

गिरीश महाजन

1995 पासून सलग सहा वेळा विधानसभेवर, 2014 ला पहिल्यांदा मंत्रिपदावर; जलसंपदा, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण खात्यांचा अनुभव; क्रीडा, पर्यंटन, कौशल्य विकास मंत्रालयाचही अनुभव

6/16

गणेश नाईक

गणेश नाईक

शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधून प्रत्येकी दोन वेळा आमदार; उत्पादन, शुल्क मंत्री, वनमंत्री, कामगार मंत्री म्हणून काम, ऐरोलीमधून सलग 6 वेळा आमदार  

7/16

मंगलप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा

आतापर्यंत 7 वेळा आमदार राहिले आहेत. मागील सरकारमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवउपक्रममंत्री होते.   

8/16

जयकुमार रावल

जयकुमार रावल

2009 पासून सलग चौथ्यांदा विधानसभेवर, इंग्लंडच्या कार्डिफ विद्यापीठातून एबीएमचे शिक्षण, 2016 ला कॅबिनेट मंत्रीपद; रोहयो, पर्यटन, अन्न, औषध, राजशिष्टाचार खात्याचा अनुभव

9/16

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

मंत्रिमंडळातील विधान परिषदेच्या एकमेव सदस्य, 2009 आणि 2014 ला विधानसभा निवडणुकीत विजयी, 2014 ला ग्रामविकास खात्याच्या मंत्रीपदी, 2019 ला धनंजय मुंडेंकडून पराभूत

10/16

अतुल सावे  आणि अशोक उईके यांनीही शपथ घेतली आहे. 

11/16

आशिष शेलार

आशिष शेलार

वांद्रे पश्चिममधून विजयाची हॅटट्रीक, मावळत्या विधानसभेचे मुख्य प्रतोद, मुंबई भाजपाचे अध्यक्ष; 2012 रोजी विधानपरिषदेवर बिनविरोध; फडणवीस सरकारमध्ये शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री  

12/16

शिवेंद्रराजे भासले

शिवेंद्रराजे भासले

2004 पासून सलग पाचव्यांदा विधानसभेवर, जावळी पंचायत समितीवर 15 वर्षांपासून वर्चस्व, 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश  

13/16

जयकुमार गोरे आणि संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली

14/16

नितेश राणे

नितेश राणे

भाजपाचा हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून ओळख, 2005 मध्ये लंडनमधून परतल्यापासून राजकारणात 

15/16

आकाश फुंडकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे

16/16

माधुरी मिसाळ, पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली