चहा सोबत गोड बिस्कीटे खाण्याची सवय असेल तर तुम्ही या समस्यांना आमंत्रण देताय

Nov 25, 2021, 23:32 PM IST
1/5

बिस्किटमध्ये हायड्रोजनेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असते. बिस्किट हे फॅट फ्री नसतात, त्यामुळे जर तुम्ही ते जास्त काळ खाल्ल्यास लठ्ठपणा वाढू शकतो आणि तुम्हाला त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात.

2/5

चहासोबत गोड बिस्किटे जास्त दिवस खाण्याची सवय रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्यात सोडियमचे प्रमाणही जास्त असते. मधुमेह आणि थायरॉईडच्या रुग्णांनी बिस्किटांचे सेवन करू नये.

3/5

बिस्किटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते.

4/5

बिस्किट हे शुद्ध पिठापासून बनवले जाते आणि त्यात फायबरचे प्रमाण नसते. जर तुम्ही ते खाल्ले तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

5/5

बिस्किटात साखरेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तुम्ही ते रोज खातात तेव्हा ते दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचवते. त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होऊन दात खराब होऊ शकतात.