फ्रिजरमध्ये साचलाय बर्फाचा डोंगर? वापरा 3 सोप्या टिप्स 1 मिनिटांत वितळेल बर्फ

सध्या प्रत्येक घरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू फ्रेश ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. परंतु अनेकदा फ्रिजरमध्ये खूप जास्त बर्फ जमा होतो परिणामी तेथे अक्षरशः बर्फाचे डोंगर तयार होतात. तेव्हा फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ लवकरात लवकर वितळवण्यासाठी 3 सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

Pooja Pawar | Oct 12, 2024, 15:42 PM IST
1/6

बर्फ वितळवण्यासाठी काहीजण डिफ्रॉस्टिंग वापरतात पण यामुळे बर्फ वितळण्यासाठी बराच वेळ लागतो. अशावेळी जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही फ्रिजमध्ये साचलेले बर्फाचे डोंगर वितळवू शकता. 

2/6

पहिली ट्रिक :

 बर्फ लवकर वितळवायचा असेल तर फ्रिज बंद करा आणि अशा ठिकाणी घेऊन जा जिथे जर पाणी पडले तर काही नुकसान होणार नाही. आता तुम्ही एका बादलीत कोमट गरम पाणी घ्या आणि ते फ्रिजच्या आतल्या भागात शिंपडा. यामुळे हळूहळू बर्फ वितळू लागेल. 

3/6

दुसरी ट्रिक :

 एक असं भांड घ्या जे तुम्ही अगदी सहज फ्रिजमध्ये ठेऊ शकता. या भांड्यात उकळलेलं पाणी ठेवा आणि अतिशय सावधपणे भांड फ्रिजमध्ये ठेऊन त्याचा दरवाजा बंद करा. मात्र हे करताना लक्ष ठेवा की फ्रिजचं विद्युत कनेक्शन यावेळी बंद असेल.   

4/6

तिसरी ट्रिक :

तुमच्या घरी हेअर ड्रायर असेल तर याचा वापर बर्फ वितळवण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्ही सर्वात आधी फ्रिजचं विद्युत कनेक्शन बंद करून त्याचा फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवा. मग हेअर ड्रायर ऑन करून त्याचा मोड हाय हिटवर ठेवा आणि बर्फ असलेल्या ठिकाणी त्याचे तोंड करून गरम वाफ द्या.

5/6

या गोष्टींची काळजी घ्या :

 फ्रिजमधून बर्फ काढताना त्याला स्टीलचा चमचा किंवा सुरीने खरडवू नका . बर्फ काढण्यासाठी लाकडाच्या चमच्याचा वापर करू शकता. जर वारंवार फ्रिजमध्ये भरपूर बर्फ साचण्याची समस्या होत असेल तर फ्रिज सर्व्हिस सेंटरला घेऊन जावा. 

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)