रतन टाटांचा मुंबईतील 'हा' Dream Project पूर्ण झाला उद्घाटन राहूनच गेलं, कारण ठरलं निवडणूक; आता व्यक्त होतेय हळहळ

Rata Tata Dream Project: केवळ भारतातच नाही तर जगभरात टाटा या नावाचा डंका वाजवणाऱ्या रतन टाटांच्या निधनानंतर अनेकांनी या पूर्ण झालेल्या पण उद्घाटन राहिलेल्या प्रकल्पासंदर्भात उघडपणे हळहळ व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय आणि हा प्रकल्प काय आहे जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती...

| Oct 12, 2024, 12:29 PM IST
1/15

tataproject

हा प्रकल्प साकारावा अशी रतन टाटांची फार पूर्वीपासूनची इच्छा होती. त्यांचा हा प्रकल्प साकारला गेला मात्र त्याचं उद्घाटन करण्याआधीच रतन टाटांचं निधन झालं. हे उद्घाटन लांबण्यासाठी कारण ठरलं निवडणूक...

2/15

ratantatadream

टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं.   

3/15

ratantatadream

हजारोंच्या संख्येनं सर्वसमान्यांपासून ते अति महत्त्वाच्या व्यक्तींनी गुरुवारी मुंबईमधील मरिन ड्राइव्ह येथील एनसीपीएच्या हॉलमध्ये रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना शेवटचा निरोप दिला.  

4/15

ratantatadream

रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.  

5/15

ratantatadream

रतन टाटांचं पार्थिव पाहून अनेकांच्या भावनांचा बांध फुटत असल्याचं हृदयद्रावक चित्र एनसीपीएमध्ये पाहायला मिळालं.  

6/15

ratantatadream

खरं तर औद्योगिक क्षेत्रातील आपल्या कामगिरीबरोबरच टाटांची आणखीन एक ओळख म्हणजे ते प्राणीप्रेमी, श्वानप्रेमी होते. त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट अगदी आजही पाहिलं तरी याची कल्पना येईल. अगदी त्यांच्या लहानपणीच्या फोटोंमध्येही त्यांचा त्यावेळेचा लाडका श्वान दिसून येतो.  

7/15

ratantatadream

आपल्या या प्राणीप्रेमापोटीच रतन टाटांच्या पुढाकाराने मुंबईतील महालक्ष्मी येथे प्राण्यांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात आलं. मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्टमध्ये या रुग्णालयासंदर्भात करारही झाला होता.  

8/15

ratantatadream

रतन टाटांच्या पुढाकाराने उभारलेल्या या रुग्णालयाचे 80 टक्के काम पूर्ण झालं असून लोकसभेच्या आचारसंहितेमुळे उद्घाटन न करताच या रुग्णालयातील अनेक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत.   

9/15

ratantatadream

रतन टाटा यांच्या उपस्थितीमध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन करणं आता कायमचं राहून गेलं असं म्हणावं लागेल. मात्र या रुग्णालयाच्या माध्यमातून रतन टाटांचं भटक्या कुत्र्यांना मोफत उपचार देण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे यात शंका नाही. पण टाटा असताना या रुग्णालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असतं तर ते अधिक योग्य झालं असतं अशी भावना आता प्राणीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.   

10/15

ratantatadream

मुंबईत यापूर्वी केवळ खारमध्ये पालिकेचा प्राण्यांचा दवाखाना होता. शहरात प्राण्यांचे खासगी 200 दवाखाने असले तरी त्याचे दर सर्वांनाच परवडतील असे नाही. अगदी सामान्य घरातील प्राणीप्रेमी व्यक्तीलाही त्याच्या आवडत्या प्राण्यावर स्वस्तात उपचार करता यावेत अशी सेवा उपलब्ध करुन देण्याची रतन टाटांची फार इच्छा होती. त्यानुसार महालक्ष्मी येथील महानगरपालिकेच्या जागेवर टाटा ट्रस्टने पुढाकार घेऊन प्राण्यांचं रुग्णालय उभारलं. मात्र त्याचं रितसर उद्घाटन राहूनच गेलं.  

11/15

ratantatadream

महालक्ष्मी येथे आर्थर रोड जेलच्या मागील बाजूला असलेल्या जमिनीवर 300 प्राण्यांवर उपचार करता येईल असं हे प्राण्यांचं आधुनिक रुग्णालय टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने उभारण्यात आलं आहे. सर दोराबाजी टाटा ट्रस्ट आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये यासंदर्भात 30 वर्षांचा करारही झालाय.

12/15

ratantatadream

महालक्ष्मीमधील प्राण्यांचं हे रुग्णालय बांधण्यासाठी या ट्रस्टला 2018 मध्ये कंत्राटही देण्यात आलं. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा पद्धतीने हे रुग्णालय उभारलं आहे. याचं बहुतांश काम पूर्ण झालं आहे. हे रुग्णालय फंक्शनल म्हणजेच कार्यरत आहे. केवळ उद्घाटन न झाल्याने प्राणीप्रेमींची अडवणूक नको या उद्देशाने येथील सेवा सुरु करण्यात आल्या.  

13/15

ratantatadream

या रुग्णालयामध्ये एक, दोन नाही तब्बल 25 विभाग असून शहरातील कोणत्याही अद्ययावत खासगी प्राणी रुग्णालयापेक्षा हे रुग्णालय सरस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या रुग्णालयातील सेवा सुरु झाल्यासंदर्भात रतन टाटांनी 1 जुलै रोजी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केली होती.

14/15

ratantatadream

या रुग्णालयामध्ये गायनॉकॉलॉजी विभाग, शल्यशिकित्सा विभाग, त्वचा रोग विभाग, आयसीयू, अपघात विभाग, आप्तकालीन विभाग, सीटीस्कॅन, एमआरआय, रेडिओलॉजी, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी असे एकूण 25 विभाग आहेत. येथे भटक्या श्वानांना आणि प्राण्यांना मोफत उपचार दिले जाणार आहेत.  

15/15

ratantatadream

लोकसभेच्या आचारसंहितेमुळे कोणत्याही उद्घाटनाशिवाय हे रुग्णालय सुरु करण्यात आले होते. या रुग्णालयचं रितसर उद्घाटन होण्याआधीच रतन टाटांनी जगाला निरोप घेतल्याने प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.