BMW कार, मानधन आणि नफ्यातील वाटा; रजनीकांत यांना 'जेलर'ने कमावलेल्या 600 कोटींमधील किती मिळाले?

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर चित्रपट सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींची कमाई केली आहे.   

Sep 02, 2023, 19:55 PM IST

 

 

1/9

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर चित्रपट सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींची कमाई केली आहे.   

2/9

तब्बल दोन वर्षांनी रजनीकांत यांना जेलर चित्रपटाच्या निमित्ताने यश चाखण्याची संधी मिळाली आहे.   

3/9

चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सन पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊसचे मालक कलानिथी मारन यांनी नुकतीच रजनीकांत यांची भेट घेतली.   

4/9

कलानिथी मारन यांनी यावेळी रजनीकांत यांना 100 कोटींचा चेक दिला. जेलर चित्रपटाला झालेल्या नफ्यातील हा भाग आहे.  

5/9

इतकंच नाही तर यावेळी रजनीकांत यांना BMW X7 ही भेट म्हणून देण्यात आली.   

6/9

दरम्यान चित्रपटासाठी रजनीकांत यांना 110 कोटींचं मानधन देण्यात आलं होतं. म्हणजेच रजनीकांत यांना जेलर चित्रपटासाठी 210 कोटी रुपये मिळाले आहेत.   

7/9

यासह सुपरस्टार रजनीकांत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते झाले आहेत.  

8/9

नेल्सन दिलीपकुमार यांनी जेलर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जेलरमध्ये रजनीकांत हे निवृत्त पोलीस अधिकारी टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत. रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, मोहनलाल (पाहुणे कलाकार), जॅकी श्रॉफ, शिवराजकुमार, योगी बाबू आणि वसंत रवी हेदेखील चित्रपटात आहेत.   

9/9

यानंतर रजनीकांत 'लाल सलाम' या चित्रपटात दिसणार आहेत.