वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं. 

नेहा चौधरी | Dec 10, 2024, 21:36 PM IST
1/7

सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एंड प्रिव्हेंशनच्या रिपोर्टनुसार प्रत्येक वयोगटाच्या शारीरिक गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. रोज जवळपास 4 ते 5 किलोमीटर चालणं उत्तम मानले जाते. जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती चाललं पाहिजे जाणून घ्या. 

2/7

18 - 30 या वयोगटातील लोकांनी किती चालावे?

  18 - 30 या वयोगटातील तरुणांमध्ये ऊर्जा जास्त आणि स्नायूंची ताकद जास्त असते. त्यामुळे या लोकांनी दररोज 30-60 मिनिटं वेगाने चालावे. वजन कमी, तणावमुक्त करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज 30-60 मिनिटं चालण्याचे टार्गेट चाललं पाहिजे.   

3/7

31 - 50 या वयोगटातील लोकांनी किती चालावे?

या वयोगटात वजन नियंत्रणात राहण्यासाठी चालणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत जुन्या आजारांना प्रतिबंध करण्यास आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी 31 - 50 या वयोगटातील लोकांनी 30 - 45 मिनिटं चालणे फायदेशीर मानलं जातं.   

4/7

51 - 65 या वयोगटातील लोकांनी किती चालावे?

या वयात अनेक दुखणे त्रासदायक ठरतात. त्यामुळे स्वत:ला स्वस्थ आणि एक्टीव्ह ठेवण्यासाठी चालणे अतिशय महत्त्वाचे आहे. या वयोगटातील लोकांनी दिवसातून 30 - 40 मिनिटं चालणं आरोग्यासाठी वरदान ठरतं. 

5/7

66 - 75 या वयोगटातील लोकांनी किती चालावे?

वृद्ध लोकांनी दिवसभरात कधीही किमान 20 - 30 मिनिटं मध्यम वेगाने चालणे फार गरजेचे आहे. या वयात चालण्याने वयोवृद्धांचा बॅलन्स चांगला राहतो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालींशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. 

6/7

ज्येष्ठ व्यक्तींनी किती चालावे?

ज्येष्ठ व्यक्ती दिवसातून 15 ते 20 मिनिटं हळूहळू चालावे. या लोकांनी नियमित चालण्याची सवय ठेवल्यास त्यांची सांधे लवचिक, स्नायूंची ताकद आणि समतोल यासाठी उपयुक्त मानले जातात. 

7/7

चालण्यासाठी काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चालण्यासाठी सपाट परिसराची निवड करावी. चालण्यासाठी चांगले शूज आणि सुरक्षित मार्ग निवडणे गरजेचे आहे. ज्यांना हालचाल करण्यास अडचण येत असेल त्यांनी वॉकर किंवा इतर गोष्टींची मदत घ्यावी. चालण्यामुळे आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहते.