शरीराच्या 'या' भागांवर कधीही परफ्यूम लावू नका! नाहीतर उद्भवेल मोठी समस्या...

आजकाल परफ्यूम लावणे हे एक फॅशनचा भाग झाला आहे. पण तुम्हाला परफ्यूम कसे वापरायचं, कुठे लावायचं माहिती नसेल तर तुमच्या आयुष्यात मोठी समस्या उद्भवू शकते. 

नेहा चौधरी | Jan 21, 2025, 16:56 PM IST
1/7

परफ्यूम हे सुंगध वासासाठी वापरलं जातं. अनेकांना महागड्या आणि वेगवेगळ्या परफ्यूम कलेक्शन करण्याची आवड असते. 

2/7

परफ्यूमचा ब्रँड आणि त्याचा वास याची तुम्हाला चांगली माहिती असते. मात्र 90 टक्के लोकांना परफ्यूम शरीराच्या कोणत्या अंगाला लावू नयेत, याबद्दल माहिती नसतं. 

3/7

डोळ्याचा अवती भवती परफ्यूम लावणे टाळा. ही त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय पातळ असते. त्यामुळे परफ्यूममुळे तुमच्या डोळ्यांना इजा होण्याची भीती असते. 

4/7

अंडरआर्म्सला परफ्यूम लावल्याने दिवसभर दुर्गंधी येत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अंडरआर्म्समध्ये कधीही चुकूनही परफ्यूम लावू नयेत. याठिकाणी त्वचे नाजूक असते त्यामुळे त्वचेशीसंबंधीत आजार होण्याची भीती असते. 

5/7

कानाच्या मागेही परफ्यूम लावू नका. कारण परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि इतर अनेक रसायने असतात, ज्यामुळे कानाच्या त्वचेला जळजळ होऊ शकते. याव्यतिरिक्त, कानात परफ्यूम लावल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो, कारण रसायने कानाच्या आतील त्वचेला नुकसान करू शकतात.

6/7

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल परफ्यूम शरीराच्या कुठल्या अंगाला लावला पाहिजे. तर मनगट, मान आणि छातीवर तुम्ही परफ्यूम लावू शकता. 

7/7

केसांमधले परफ्यूम म्हणजे तेले जे परफ्यूमप्रमाणे तासन् तास सुगंधित राहतात. त्याचा सुगंध दिवसभर तुमच्या केसांमध्ये राहील आणि उन्हाळ्यात शरीरातील घामाच्या वासापासून मुक्त होण्यास मदत होईल.