PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांचा वडील 1200 कोटींचा मालक

Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध बॉलिवूड स्टार असून तो अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहे. 800 कोटींच्या हवेलाचा मालक आणि 1200 कोटींची संपत्ती आहे. 

नेहा चौधरी | Aug 16, 2024, 08:48 AM IST
1/8

तीन दशकापासून तो बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. आई बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने त्याला अभिनयाचा धडा घरातून मिळाला. पण अभिनय आणि डान्स हा हे तिला जमत नाही अशी टीपणी त्याला पहिला चित्रपट आणि दिग्दर्शकांकडून ऐकावी लागली. पण त्याने हार मानली नाही आणि आज त्याचा अभिनयाला कसली तोड नाही.  

2/8

आम्ही बोलत आहोत, नवाब कुटुंबाचा लाडका आणि अभिनेत्री शर्मिला टागोर, माजी भारतीय क्रिकेट मन्सूर अली खान यांचा मुलगा सैफ अली खान. आज अभिनेत्याचा 54 व्या वाढदिवस आहे. त्याचा जन्म 16 ऑगस्ट 1970 रोजी नवी दिल्लीमध्ये झाला होता. तो आगामी चित्रपट साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा : पार्ट 1' दिसणार आहे. यासोबत तो अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना भेटणार आहे. 

3/8

सैफला पहिल्या चित्रपटातून काढण्यात आलं होतं. 1991 मध्ये दिग्दर्शक राहुल रवैल यांनी त्याच्या बेखुदी चित्रपटासाठी मुख्य अभिनेता म्हणून साइन केलं होतं. काजोल आणि सैफ यात झळकणार होते. पण सैफचा अभिनय पासून राहुल नाराज झाले आणि त्यांनी सैफला चित्रपटातून काढून टाकले. सैफ अली खानने 1993 मध्ये यश चोप्रा यांच्या 'परंपरा' चित्रपटातून डेब्यू केला होता. मात्र, तो बॉलिवूडमध्ये स्टार दर्जा मिळवू शकला नाही. 

4/8

पण सैफने क्राईम ड्रामा, अॅक्शन थ्रिलर, कॉमिक आणि रोमान्सचा बादशाह आहे. आज त्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सात फिल्मफेअर आणि पद्मश्री पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सैफचं खरं नाव हे सैफ साजिद अली खान आहे. चित्रपटा आल्यानंतर त्याच नाव सैफ करण्यात आलंय. 

5/8

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सैफ अली खानची अमृता सिंगसोबत मैत्री झाली. दोघेही वरच्या वर एकमेकांना भेट होते. त्यांचा मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. 12 मोठ्या असलेल्या अमृताशी 1991 मध्ये सैफ अली खानने लग्न केले. या दोघांची मुलगी सारा अली खान एक सुपरस्टार तर मुलगा इब्राहिम अली खानसुद्धा सिनेसृष्टीत नशीब आजमावतोय. पण हे लग्न 13 वर्ष टिकलं. भांडण, घटस्फोट आणि पोटगी यासगळ्यांने सैफली खान चर्चेत होता. 

6/8

त्यानंतर बराच काळ सिंगल असणाऱ्या सैफच्या आयुष्यात करीना कपूरची एन्ट्री झाली. करीना सैफपेक्षा 10 वर्ष लहान, पण वयाची तमा न बाळगता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानतंर 5 वर्षे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 त्यांनी लग्न केलं. त्यांना तैमूर आणि जहांगीर असं दोन मुलं आहेत. 

7/8

गुगलवर एक सर्च करण्यात येतोय की, सैफ अली खानचा संदर्भ मुघलांशी आहे का? तर 1946 मध्ये इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेले इफ्तिखार अली खान पतौडी आणि भोपाळच्या नवाब बेगम साजिदा सुलतान यांचं ते नातू आहेत. भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान हे त्यांचे पणजोबा होते आणि क्रिकेटपटू साद बिन जंग हे त्यांचे पहिले चुलत भाऊ होते. 

8/8

सैफ अली खानच्या या आलिशान हवेलीची किंमत 800 कोटी रुपये आहे. यात 150 खोल्या आहेत. सैफच्या 'तांडव' या मालिकेचे शूटिंगही याच हवेलीत करण्यात आलं होतं. CNBC Tv18 च्या रिपोर्टनुसार, सैफची एकूण संपत्ती 1200 कोटींच्या घरात आहे.